मुख्यमंत्र्यांविना पार पडलं सत्ताधाऱ्याचं चहापान, विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशात वातावरण तापणार!

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या चहापानाच्या कार्यकर्मावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला. तसंच हिवाळी अधिवेशात विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापणार असल्याचं आता स्पष्ट आहे.

मुख्यमंत्र्यांविना पार पडलं सत्ताधाऱ्याचं चहापान, विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशात वातावरण तापणार!
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे चहापान
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:32 PM

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षपणे सहभागी नव्हते. मात्र, त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या चहापानाच्या कार्यकर्मावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला. तसंच हिवाळी अधिवेशात विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापणार असल्याचं आता स्पष्ट आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यकर्माला काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, अंबादास दानवे आदी नेत्यांनी उपस्थिती लावली. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडेंनीही चहापानाला उपस्थिती लावली. दरम्यान, चहापानापूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात चहापानापूर्वी विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले.

मंत्रिमंडळ बैठकीत रणनिती

चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरु झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत. या बैठकीत विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, त्यांचे मुद्दे कसे खोडून काढायचे आणि महत्वाचे प्रस्ताव, विधेयकांवर चर्चा होणार असल्याचं स्पष्ट आहे.

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्यातील आघाडी सरकारने आम्हाला पहिल्यांदाच चहापानाचं आमंत्रण दिलं आहे. पण राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. हे सरकार कोणत्याच मुद्द्यावर संवेदनशील नाही. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 8 प्रमुख मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज्य हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाहीला कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. पण महाराष्ट्र सरकारची मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि रोखशाही सुरू आहे, असा हल्ला फडणवीसांनी चढवला.

इतर बातम्या :

नागपुरातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी! पटोले, राऊत, केदार यांना दिल्लीचं बोलावणं

पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का?; नवाब मलिकांचा फडणवीसांना सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.