राहुल गांधी तामिळ मुलीशी विवाह करणार?; एका महिलेचा प्रस्ताव अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचं ट्विट

देशात निर्माण झालेली बेरोजगारी आणि प्रचंड महागाईच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. शनिवारी त्यांनी तामिळनाडू पिंजून काढला. या यात्रे दरम्यान ते सर्वांना भेटत आहेत.

राहुल गांधी तामिळ मुलीशी विवाह करणार?; एका महिलेचा प्रस्ताव अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचं ट्विट
राहुल गांधी तामिळ मुलीशी विवाह करणार?; एका महिलेचा प्रस्ताव अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचं ट्विटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 1:12 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. राहुल गांधी स्वत: पायी पायी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. लोकांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याचवेळी त्यांची यात्रा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येऊ लागली आहे. राहुल गांधी यांच्या ब्रँडेड बूट आणि टी-शर्टवरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या दहा लाखाच्या सूटचा विषय काढून भाजपला जोरदार उत्तर दिलं आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता अजून एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे राहुल गांधी यांच्या विवाहाची. राहुल गांधी काल कन्याकुमारीत आले असताना रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या एका महिलेने त्यांना तामिळ मुलीशी विवाह करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केलं अन् राहुल गांधी यांच्या लग्नाच्या चर्चांचा धुरळा उडला आहे.

राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंतची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आज त्यांच्या यात्रेचा चौथा दिवस आहे. यापूर्वी शनिवारी दुपारी त्यांनी कन्याकुमारीच्या मार्तंडममध्ये रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. या महिलांनी राहुल गांधी यांना त्यांच्या विवाहावरून चर्चा केल्याचं रमेश यांचं म्हणणं आहे. तुमचं तामिळनाडूवर प्रचंड प्रेम आहे, हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळे आम्ही तुमचं लग्न एखाद्या तामिळ मुलीशी लावून द्यायला तयार आहोत, असं या महिला राहुल गांधी यांना म्हणाल्या. जयराम रमेश यांनी हा सर्व किस्सा शेअर केला आहे. तसेच या महिलांसोबत चर्चा करताना राहुल गांधी प्रचंड खूश असल्याचं दिसून येत होतं, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

तामिळनाडू पिंजून काढला

देशात निर्माण झालेली बेरोजगारी आणि प्रचंड महागाईच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. शनिवारी त्यांनी तामिळनाडू पिंजून काढला. या यात्रे दरम्यान ते सर्वांना भेटत आहेत. त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ग्रामीण भारत आणि त्यातील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सफाई कामगारांशी चर्चा

शनिवारी त्यांनी आशिया खंडातील पहिली बसचालक महिला वसंतकुमारी यांची भेट घेतली. वसंतकुमारी या स्वत: राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानात सामील झाल्या होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी सफाई कामगारांशी चर्चा केली. तामिळनाडूचा दौरा संपत असताना ते केरळच्या बॉर्डरवर आले. त्यावेळी त्यांनी एका चहावाल्याशी चर्चा केली. त्यांच्या यात्रेचा चौथा दिवस केरळपासून सुरू झाला.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.