‘प्रज्ञा ठाकूरने मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली नसती’
भोपाळ : प्रज्ञा ठाकूरने दहशतवादी मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली नसती, असे म्हणत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. ते भोपाळमधील अशोका गार्डन येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. भोपाळ मतदारसंघातून भाजपकडून प्रज्ञा ठाकूर आणि काँग्रेसकडून दिग्विजय सिंह निवडणूक मैदानात आहेत. दिग्विजय म्हणाले, “प्रज्ञा ठाकूर यांनी दहशतवादविरोधी पथकाचे […]
भोपाळ : प्रज्ञा ठाकूरने दहशतवादी मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली नसती, असे म्हणत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. ते भोपाळमधील अशोका गार्डन येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. भोपाळ मतदारसंघातून भाजपकडून प्रज्ञा ठाकूर आणि काँग्रेसकडून दिग्विजय सिंह निवडणूक मैदानात आहेत.
दिग्विजय म्हणाले, “प्रज्ञा ठाकूर यांनी दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) प्रमुख हेमंत करकरे यांना शाप दिला. धर्मद्रोही आणि देशद्रोही ठरवले. मात्र, करकरे अशी व्यक्ती आहे, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. ते शहीद आहेत.”
यावेळी दिग्विजय यांनी संरक्षणाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. ‘मोदी नरकात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून मारु म्हणतात. मग, देशात पुलवामा, पठाणकोट आणि उरी येथील हल्ले झाले ते रोखण्यात अपयश का आलं? हे मोदींनी सांगावं.’
‘500 वर्षांपर्यंत मुस्लिमांनी राज्य केलं’
दिग्विजय म्हणाले, “हे लोक म्हणतात हिंदू धोक्यात आहेत, म्हणून त्यांनी एकीने राहायला हवे. मात्र, या देशात 500 वर्षांपर्यंत मुस्लिम राजांनी राज्य केले, तरी त्यांनी कोणत्याही धर्माचे नुकसान केले नाही. त्यामुळे तुम्ही धर्माचा बाजार करणाऱ्यांपासून सावध राहायला हवे.”