पैलवान नरसिंग यादवचं ACP पदावरुन निलंबन

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाल्याने प्रसिद्ध पैलवान नरसिंग यादवचं सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरुन निलंबन करण्यात आलं आहे. मुंबईतील शस्त्र पोलिसात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणजेच एसीपी म्हणून कार्यरत होता. नरसिंग यादव याच्याविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैलवान नरसिंग यादवने काँग्रेस उमेदवार संजय […]

पैलवान नरसिंग यादवचं ACP पदावरुन निलंबन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाल्याने प्रसिद्ध पैलवान नरसिंग यादवचं सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरुन निलंबन करण्यात आलं आहे. मुंबईतील शस्त्र पोलिसात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणजेच एसीपी म्हणून कार्यरत होता. नरसिंग यादव याच्याविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैलवान नरसिंग यादवने काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतल्याने, त्याच्यावर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाने नरसिंग यादवची गंभीर दखल घेतली. अखेर त्याला पदावरुन निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र डीजीपींनी संबंधितांकडून माहिती घेऊन, नरसिंग यादवला नोटीस पाठवून, उत्तर मागवलं. त्यानंतर कारवाई केली.

कुठलाही सरकारी कर्मचारी कुठल्याही पक्षाचा प्रचार करु शकत नाही, असे आदर्श आचारसंहितेत सांगण्यात आले आहे. त्यानुसारच नरसिंग यादवर कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहे नरसिंग यादव?

नरसिंग यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. नरसिंग यादवने कुस्तीमध्ये भारताचं नाव जगभरात पोहोचवलं आहे. 2010 साली एशियन चॅम्पियनशिपच्या 74 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत नरसिंगने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक, एशियन गेम्स अशा जगातल्या नामांकित स्पर्धांमध्ये नरसिंग यादवने भारताचं प्रतिनिधित्त्व केले आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.