तुमची गाठ यशोमतीशी आहे, नाठाळाचे माथी काठी हाणू : यशोमती ठाकूर कडाडल्या

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपला इशारा दिला आहे (Yashomati Thakur aggressive against BJP).

तुमची गाठ यशोमतीशी आहे, नाठाळाचे माथी काठी हाणू : यशोमती ठाकूर कडाडल्या
Yashomati Thakur
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 8:36 PM

मुंबई : कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपला इशारा दिला आहे (Yashomati Thakur aggressive against BJP). “राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर तुमची गाठ थेट यशोमतीशी आहे”, असा इशारा त्यांनी दिला आहे (Yashomati Thakur aggressive against BJP).

“कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भाजपने घाणेरडे राजकारण सुरु ठेवलंच आहे. शेणातला किडा जसा शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांना एवढी मोठी सत्ता मिळाली. तरी त्यांचा हाव आता राज्यामध्ये आहे. राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मला सातत्याने काही लोक विचारतात की महाराष्ट्रात नेमकं काय होणार? महाराष्ट्र सरकार स्थिर आहे”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

“महाराष्ट्राने नवा फॉर्म्युला देशासमोर ठेवला आहे. हा फॉर्म्युला खूप चांगला आहे. याशिवाय हा फॉर्म्युला दीर्घकाळ राहील. कुणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कुणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलंच बदडू. आम्ही गांधीवादी आहोत. पण भाजपची दादागिरी किती दिवस सहन करायची?”, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.

“आम्ही तुकाराम महाराजांची शिकवण शिकलेलो आहोत. नाठाळांच्या डोक्यावर काठी कशी मारायची हे आम्हालाही कळतं. तुमची गाठ आमच्याशी आणि यशोमती ठाकूरशी आहे, हे लक्षात ठेवा”, अशा शब्दात यशोमती ठाकूर कडाडल्या.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना घेऊन फिरत आहेत ते खरंतर बाहेरुन आलेले लोक आहेत. भाजप पक्ष दुर्बल झाला आहे. भाजपच्या 105 आमदारांमध्ये कित्येक जण आमच्यापैकी त्यांच्यात गेलेले आहेत. ते कधीही आमच्याकडे येतील. आमच्या संपर्कात कोण आहे, हे तुम्हाला कळलं तर फार मोठा भूकंप होईल”, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.