Yashomati Thakur : उमेश कोल्हेंच्या हत्येचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, मास्टरमाईंड त्यांचाच कार्यकर्ता, यशोमती ठाकूर यांच्या आरोपानं खळबळ

'राणा दापत्य म्हणजे उलट्या चोऱ्याच्या जोरात बोंबा. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता आहे,' असं म्हणत हनुमान चालीसा पठणावरूनही माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Yashomati Thakur : उमेश कोल्हेंच्या हत्येचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, मास्टरमाईंड त्यांचाच कार्यकर्ता, यशोमती ठाकूर यांच्या आरोपानं खळबळ
खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 3:00 PM

अमरावती : अमरावतीत उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्येची घटना दाबण्याचा प्रयत्न माजी पालकमंत्री आणि सीपींनी केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले होता. यावरच माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याने उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा इव्हेंट केल्याचा पलटवार केलाय. यशोमती ठाकूर यांच्या गंभीर आरोपानं खळबळ उडाली आहे.  उमेश कोल्हे (54) यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. 21 जून 2022ला कोल्हे रात्री उशिरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. भाजपाच्या वादग्रस्त नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ कोल्हेंनी पोस्ट लिहिली होती. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी माजी पालकमंत्र्यांवर प्रकरण दाबल्याचा आरोप केला होता. यालाच यशोमती ठाकूर यांनी पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत.

मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की, ‘राणा दापत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता आहे. हनुमान चालीसा पठणावरूनही माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला. राणा दाम्पत्याकडून पब्लिसिटी आणि  सर्व गोष्टींचं राजकारण केलं जातं.’

हे सुद्धा वाचा

काय होती घटना?

उमेश कोल्हे (54) यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. 21 जून 2022ला कोल्हे रात्री उशिरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार करत त्यांची हत्या केली. वादग्रस्त भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

नवनीत राणा यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, ‘मागील 12 वर्षांपासून मी अमरावतीत राहते. अमरावती माझे सासर आहे. मात्र, अशाप्रकारची घटना मी कधी पाहिली नाही. अमरावती शांत शहर होते. सर्वजण एकतेत राहत होते. हे पोलीस आयुक्तांचे अपयश आहे. आधी याठिकाणी दंगली झाल्या, लोकांवर दगडफेक करण्यात आली, त्यावेळीदेखील येथे कायदा-सुव्यवस्था निर्माण झाली होती. त्यावेळीदेखील त्यांचे अपयश होते, असा आरोप त्यांनी पोलीस आयुक्तांवर केला होता. आणखी काही जणांना वेगवेगळ्या नंबरवरून धमक्या येत आहेत. आम्ही अमरावती सोडून जातो, असे धमक्या मिळालेल्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी विचार करण्याची गरज आहे,’ असे त्या म्हणाल्या होत्या.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.