शिवसेनेचे मंत्रिपदाचे चार दावेदार पराभूत, भावना गवळी मंत्रिपदाच्या रेसमध्ये?

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या उमेदवार भावना गवळी यांनी 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. भावना गवळी यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भावना गवळी यांनी […]

शिवसेनेचे मंत्रिपदाचे चार दावेदार पराभूत, भावना गवळी मंत्रिपदाच्या रेसमध्ये?
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 1:49 PM

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या उमेदवार भावना गवळी यांनी 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. भावना गवळी यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भावना गवळी यांनी आघाडी घेतली.

“आजचा हा विजय कार्यकर्ते तसेच नेत्याच्या विश्वासचा विजय असून सर्वांनी प्रामाणिकपने काम केल्याने हे यश मिळालं, अशी प्रक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली.

भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा, तर वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार झाल्या आहेत. त्यामुळे भावना गवळी या शिवसेनेतील यंदा निवडून आलेल्या खासदारांपैकी सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदार ठरल्या आहेत. त्यामुळे भावना गवळी यांना मंत्रिपद मिळण्याची आशा यवतमाळ-वाशिमच्या नागरिकांना आहे. भावना गवळी यांच्या सलग पाचव्या विजयामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा यवतमाळ आणि वाशिममधील नागरिकांना आहे.

वाचा : शिवसेनेचे मंत्रिपदाचे चारही दावेदार पराभूत!

शिवसेनेचे अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे यांसारखे दिग्गज शिवसेना नेते आणि केंद्रात मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार पराभूत झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिकवेळा विजयी खासदार म्हणून भावना गवळी यांच्या नावाचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो.

यवतमाळमध्ये कुणाला किती मतं मिळाली?

  • भावना गवळी (शिवसेना) – 542098
  • माणिकराव ठाकरे (काँग्रेस) – 424159
  • डॉ. प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी) -94228
  • वैशाली येडे (प्रहार जनशक्ती) – 20620
  • पी. बी. आडे (अपक्ष) – 24499
  • नोटा – 3961

यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी एकूण 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव करुन, एकप्रकारे भावना गवळी या जायंट किलर ठरल्या आहेत.

दरम्यान, सलग पाचव्यांदा यवतमाळ-वाशिममधून जिंकलेल्या भावना गवळी यांना केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.