छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मी पुन्हा घेईन, पुन्हा घेईन : उद्धव ठाकरे
जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही." असेही उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले. महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) राहिले. सभागृहातील कामाकाजादरम्यान भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर टीका केली.
याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका खोडून काढत भाजपचा समाचार घेतला. “जर छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो मी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेईल, हो मी आई वडिलांची शपथ घेतली मी पुन्हा घेईल. जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही.” असेही उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.
“या सभागृहाने माझ्यावर जो विश्वास त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतो आहे.” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्राच्या जनतेमुळे मी येथे आलो, मी त्यांचे आभार मानतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. हे माझं भाग्य आहे. मी येथे येताना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मी आलो. देशात अनेक राज्ये आहेत, मात्र आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.” असेही मुख्यमंत्री (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.
“शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले त्या मातीतच जन्मलेले आम्ही सर्व शिवभक्त आहोत. या सभागृहात आल्यानंतर काहीसं दडपण नक्कीच होतं. मी मैदानातील माणूस आहे, या वैधानिक कामाचा मला अनुभव नाही. त्यामुळे वागायचं कसं हा प्रश्न होता. पण येथे आल्यावर मला वाटलं मैदानात चांगलं असतं.” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
“आज मी रिकाम्या बाकांशी काही लढणार नाही. मोकळ्या मैदानात तलवारबाजी करणारा मी नाही. मी समोरासमोर लढणारा आणि शत्रूला अंगावर घेणारा आहे. अर्थात ते शत्रू नाहीत. दुर्दैवाने ते राजकीय विरोधक आहेत.” असेही उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly) म्हणाले.
“मी सभागृहात आल्यावर हे फोटो पाहिले. हे फोटो कुणाचे आहेत? यांचे फक्त भाषणात नावं घ्यायचे आणि हा महाराष्ट्र फक्त शाहू, फुले, आंबेडकर यांचा असल्याचं म्हणायचं. मग शपथ घेताना त्यांचं नाव घेतलं तर यांना इंगळ्या का डसाव्यात?” अशी टीकाही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले. महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ज्यांचा मंत्रिमंडळावर यांनी ज्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी एका बाजूला बसण्याचे आदेश दिले.