Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

108 वर्षांपूर्वी पूर्वज आले अन् मुंबईकर झाले, तीनदा बेस्ट आमदार; कोण आहेत योगेश सागर?

भाजपचे आमदार योगेश सागर हे अभ्यासू आणि स्पष्ट वक्ते आमदार म्हणून ओळखले जातात. (Yogesh Sagar well known for his Social Work, know about him)

108 वर्षांपूर्वी पूर्वज आले अन् मुंबईकर झाले, तीनदा बेस्ट आमदार; कोण आहेत योगेश सागर?
yogesh sagar
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 10:01 AM

मुंबई: भाजपचे आमदार योगेश सागर हे अभ्यासू आणि स्पष्ट वक्ते आमदार म्हणून ओळखले जातात. तिसऱ्यांदा बेस्ट आमदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 108 वर्षांपूर्वी योगेश सागर यांचे पूर्वज गुजरातहून मुंबईत आले आणि मुंबईतच स्थायिक झाले. त्याअर्थाने योगेश सागर हे पक्के मुंबईकर आहेत. अस्खलित मराठीत बोलणारे योगेश सागर नेमके कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? यावर टाकलेला हा प्रकाश. (Yogesh Sagar well known for his Social Work, know about him)

108 वर्षांपूर्वी पूर्वज मुंबईत

योगेश सागर यांचं मूळ गाव गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात आहे. त्यांचे पूर्वज 108 वर्षांपूर्वी मुंबईत आले. सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर ते इथेच स्थायिक झाले आणि योगेश सागर यांचं कुटुंब मुंबईकर होऊन गेलं.

राजकारणात कधीपासून?

योगेश सागर हे 1989मध्ये राजकारणात आले. 1989मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लोकसभा निवडणुकीला उभे होते. त्यावेळी योगेश सागर यांनी भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. 2000मध्ये मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीचं त्यांना तिकीट देण्यात आलं. या निवडणुकीत ते विजयी झाले आणि नगरसेवक बनले. इथूनच त्यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर ते सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2000 ते 2012 पर्यंत ते नगरसेवक होते. त्यावेळी मतदारसंघातील स्वच्छतेसाठी महापौरांनी त्यांना उत्कृष्ट नगरसेवक म्हणून गौरवलं होतं.

फडणवीस सरकारमध्ये नगरविकास राज्यमंत्री

2009मध्ये ते पहिल्यांदा कांदिवलीच्या चारकोप विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आणि आमदार बनले. त्यानंतर सतत तीनवेळा ते निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना नगरविकास राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. अभ्यासू आमदार, संसदीय आयुधांचा खुबीने वापर करणारा, प्रश्नांची जाण असलेला आणि मुंबईची खडा न् खडा माहिती असलेला आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

जलयुक्त शिवाराचं मोठं काम

राज्यातील सातारा, सांगली आणि अकोला जिल्ह्यातील 23 गावात सरकारची जलयुक्त शिवार योजना त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने राबवली. त्यामुळे त्यांना 2011 ते 2013 दरम्यान सतत तीन वर्षे प्रजा फाऊंडेशनचा बेस्ट आमदारचा पुरस्कार मिळाला.

मराठी मतदारांमध्येही लोकप्रिय

योगेश सागर यांच्या चारकोप विधानसभा मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार मोठ्या संख्येने आहेत. सागर हे गुजराती मतदारांमध्ये लोकप्रिय आहेच. शिवाय मराठी मतदारांमध्येही ते लोकप्रिय आहेत. त्यांची साधी राहणीमान, मराठीवरील प्रभुत्व, प्रश्न हातावेगळा करण्याची हातोटी आणि मतदारांच्या अडचणीला धावून जाणे या कारणामुळे मराठी मतदारही त्यांच्या मागे सतत उभा राहिलेला आहे. (Yogesh Sagar well known for his Social Work, know about him)

संबंधित बातम्या:

बिगारी कामगार ते विधानसभेचे उपाध्यक्ष; जाणून घ्या नरहरी झिरवाळांबद्दल!

कट्टर काँग्रेसी, थेट उद्वव ठाकरेंना उपोषणाचा इशारा; वाचा, कोण आहेत कैलास गोरंट्याल?

काँग्रेसच्या गडात कमळ फुलवले; वाचा कोण आहेत काशीराम पावरा?

(Yogesh Sagar well known for his Social Work, know about him)

मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.