Rahul Gandhi : धारावीची जमीन घेता, कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे…राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi : "भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. डोळयादेखत कोट्यवधी रुपये देऊन तुमचं सरकार तुमच्यापासून हिरावून घेतलं" असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : धारावीची जमीन घेता, कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे...राहुल गांधींचा सवाल
नरेंद्र मोदी, राहुल गांधीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 1:31 PM

“धारावीची जमीन घेता. कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे श्रीमंत आहेत. दलित, आदिवासी , ओबीसी नाहीत. दलित, ओबीसी आणि आदिवासी जिथे आहेत, तिथे जमीन हडप केली जाते. मी जमीन अधिग्रहणावर भाष्य केलं तेव्हापासून अदानी, अंबानीचे लोक माझ्या मागे लागले. माझी प्रतिमा बदनाम केली जात आहे. धारावीची जमीन जात असेल हजोरो कोटी अब्जाधीशांच्या घशात जात असतील, तर हजारो कोटी रुपये गरिबांना मिळाले पाहिजेत” असं राहुल गांधी म्हणाले. “तुमची जमीन त्यांना पाहिजे, त्यांना तुमचं जल पाहिजे, जंगल पाहिजे. ते तुमच्याकडून सर्व घेऊ पाहत आहेत. 25 अब्जाधीश आहेत. त्यांचे 16 लाख कोटी रुपये या सरकारने माफ केले आहेत. आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. एक लाख कोटी रुपये अदानीला धारावीत दिले जाणार आहेत. त्यांना वाटतं सहज होईल. पण ते सहज शक्य होणार नाही. राहुल गांधी इथे उभा आहे” असं आव्हान राहुल गांधी यांनी दिला.

“अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले पाहिजे, असं संविधानात कुठे लिहिलं आहे. संविधान हे शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराजांनी प्राण सोडला असता, पण गरीबांच्या जमिनी जाऊ दिल्या नसत्या. शिवाजी महाराजांनी प्राण सोडले असते पण धारावीची जमीन जाऊ देऊ दिली नसती. शिवाजी महाराजांनी जमिनींचं रक्षण केलं असतं” असं राहुल गांधी म्हणाले.

‘प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 3 हजार रुपये येतील’

“आमचं सरकार आलं तर डिसेंबरमध्ये तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल. तेव्हा बँकेत जाऊन खातं चेक कराल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल इंडिया आघाडीने तुमच्या खात्यात महिन्याचे 3 हजार रुपये टाकले आहेत. तुम्ही मुलांना सांगाल, 3 हजार रुपये आमच्या खात्यात आले. तुमची मुलं सांगतील प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 3 हजार रुपये येतील. आमचे सरकार प्रत्येक महिन्याला पैसे टाकणार. जसे मोदी अब्जाधीश अदानीच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकतात. तसेच आम्ही महिलांच्या खात्यात पैसे टाकणार आहोत” असं राहुल गांधी म्हणाले.

‘सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय?’

“सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय? हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. डोळयादेखत कोट्यवधी रुपये देऊन तुमचं सरकार तुमच्यापासून हिरावून घेतलं. चोरी केलं. मोदी आणि शाह यांनी संपूर्ण देशाला माहीत आहे, या दोघांनी हे काम केलं आहे” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.