तुम्हाला पाच मिनिटं दिली होती, आता फार झालं; अमित शाह आपल्याच नेत्यावर का संतापले?
त्यामुळे शाह हे चाांगलेच अस्वस्थ झाले. त्यांनी माईक हातात घेत अनिलजी, तुम्हाला स्वागत करायचं होतं. तुम्हाला त्यासाठी पाच मिनिट देण्यात आले होते. तुम्ही आधीच साडे आठ मिनिटं बोलले आहात.

चंदीगड: देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे (bjp) नेते अमित शाह (Amit Shah) आपल्याच पक्षाच्या नेत्यावर प्रचंड संतापले. एका कार्यक्रमात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) भाषण करायला उभे होते. विज यांचं भाषण लांबल्याने अमित शाह अस्वस्थ झाले. विज यांच्या 8 मिनिटाच्या भाषणात शाह यांनी त्यांना चारवेळा टोकलं. तरीही विज यांनी भाषण सुरूच ठेवलं. त्यामुळे शाह संताप व्यक्त केला. तुम्हाला पाच मिनिटं दिली होती, आता फार झालं. तुमचं भाषण थांबवा, असं अमित शाह यांनी म्हटलं. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांची चांगलीच पळापळ झाली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचं दोन दिवसांचं संमेलन आयोजित केलं होतं. हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये हे संमेलन होतं. यावेळी गृहमंत्री अनिल विज हे भाषण करायला उभे राहिले. त्यांचं हे भाषण लांबल्याने शाह यांनी त्यांना फटकारले. साडे आठ मिनिटाच्या भाषणात शाह यांनी त्यांना चार वेळा टोकलं. तुम्हाल केवळ पाच मिनिटं दिलेली आहेत, असं स्मरणही त्यांनी करून दिलं. विज यांना स्वागतपर भाषण करायचं होतं. तर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना मुख्य भाषण करायचं होतं. तर शाह या सोहळ्यातील शेवटचे वक्त होते.
अनिल विज हे स्वागपर भाषण करण्यासाठी उभे राहिले होते. त्यांना सर्वांचे आभार मानून जागेवर बसायचं होतं. पण त्यांनी भाषणात हरियाणाचा इतिहास सांगायला सुरुवात केली. हरित क्रांतीतील हरियाणाचं योगदान, ऑलिम्पिकमधील प्रदर्शन आणि राज्य सरकारची कामे सांगण्यास विज यांनी सुरुवात केली.
जब अनिल विज को अमित शाह ने कई बार टोका…
हरियाणा के सूरजकुंड में राज्यों के गृह मंत्रियों के साथ गृह मंत्री अमित शाह की मीटिंग में हरियाणा के गृह मंत्री अनिल विज ने भाषण देने के लिए तय समय से ज्यादा वक्त लिया. इसको लेकर अमित शाह ने उन्हें कई बार टोका.
वीडियो ? pic.twitter.com/qugzXcYQL6
— Kumar Abhishek (@active_abhi) October 28, 2022
अमित शाह मंचावर बाजूलाच बसले होते. यावेळी त्यांनी विज यांना एक चिठ्ठी पाठवली. जाहीर भाषण बंद करून पुढील कार्यक्रम सुरू करण्याची सूचना शाह यांनी विज यांना केली. पण त्याने काहीच परिणाम झाला नाही. त्यावेळी त्यांनी आपला माईक सुरू केला. विज यांच्याकडे इशारा करून त्यांना टोकलं. तरीही विज यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही.
त्यामुळे शाह हे चाांगलेच अस्वस्थ झाले. त्यांनी माईक हातात घेत अनिलजी, तुम्हाला स्वागत करायचं होतं. तुम्हाला त्यासाठी पाच मिनिट देण्यात आले होते. तुम्ही आधीच साडे आठ मिनिटं बोलले आहात. कृपया तुमचं भाषण थांबवा. एवढं लांबलचक भाषण करण्याची ही जागा नाही, असं शाह म्हणाले. त्यावर विज यांनी आणखी काही सेकंद मागितले. मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, असं ते म्हणाले. त्यावर त्यांना परवानगी दिली.
त्यानंतर विज यांनी सरकारच्या कामाची यादीच वाचायला सुरुवात केली. चारवेळा टोकल्यानंतरही विज यांनी यादी वाचायला सुरुवात केल्याने शाह भडकले. पुन्हा शाह यांनी हातात माईक घेतला. अनिलजी, मला माफ करा. आता हे थांबवा. आता सक्तीने हा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे, असं शाह म्हणाले.