आदित्य ठाकरे अपघातातून थोडक्यात बचावले!
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कोल्हापुरात एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापुरात स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भातील कार्यक्रमात मंडप हवेत उडाल्याने, खांब पकडून धरण्याची वेळ उपस्थित कार्यर्त्यांवर आली. कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे आदित्य ठाकरे हे अपघातातून थोडक्यात बचावले. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुखरुप आहेत. स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भातील कोल्हापुरातील हा […]
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कोल्हापुरात एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापुरात स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भातील कार्यक्रमात मंडप हवेत उडाल्याने, खांब पकडून धरण्याची वेळ उपस्थित कार्यर्त्यांवर आली. कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे आदित्य ठाकरे हे अपघातातून थोडक्यात बचावले. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुखरुप आहेत.
स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भातील कोल्हापुरातील हा कार्यक्रम माळरानावर असल्याने, तिथल्या सोसाट्या वाऱ्यामुळे मंडप उडालं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत मंडपाचे खांब पकडून ठेवले आणि सुदैवाने मंडप खाली कोसळलं नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे हे या अपघातातून बचावले.
व्हिडीओ :
कोल्हापूरच्या अंबाबाईला आदित्य ठाकरेंचं साकडं
दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल अंबाबाईला साकडं घातलं. राम मंदिराच्या संदर्भात झोपलेल्या कुंभकर्णला जागं करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात साकडं घातल्याचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. राम मंदिर व्हावं ही संपूर्ण देशाची मागणी आहे, सरकारनं त्यावर खरं उतरावं असंही आदित्य ठाकरे म्हणाले. काल सायंकाळी आदित्य ठाकरे यांनी अंबाबाई मंदिरासमोर आरती करुन देवीला हे साकडं घातलं. शिवाय बिनजुमल्याचं सरकार यावं अशी मागणी देखील देवीकडे केली असल्याचं ठाकरे सांगितलं. राज्यातील दुष्काळ नाहीसा व्हावा यासाठी देखील देवीची प्रार्थना केल्याचं आदित्य म्हणाले.
‘राष्ट्रपतींपासून पोस्टापर्यंत यांचंच सरकार’
‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात केवळ चर्चाच होते, त्यात कामं काहीच होत नाहीत. शिवसेना मात्र जे बोलते ते करते अशी बोचरी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. ते कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. चंदगडमधील कार्य़क्रमात बोलताना त्यांनी ही मोदींवर टीका केली. शिवाय आदित्य ठाकरे यांनी राम मंदिरावरुन सरकारवर टीका केली. राष्ट्रपतीपदापासून पोस्ट ऑफिसपर्य़ंत यांची सत्ता आहे. मग आता राम मंदिर उभारलं नाही, तर कधी उभारणार अशीही टीका आदित्य ठाकरेयांनी केली.