‘जड अंत:करणाने निर्णय घेतोय, सांगण्यास दु:ख होतंय’, आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदाराचं टोकाचं पाऊल

शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. युना सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र लिहित आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मनाच्या अस्वस्थतेबद्दल उल्लेख केलाय.

'जड अंत:करणाने निर्णय घेतोय, सांगण्यास दु:ख होतंय', आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदाराचं टोकाचं पाऊल
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 8:29 PM

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खंद्या कार्यकर्त्याने कोक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. युवा सेनेचे कोक्षाध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवत राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र लिहित आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमेय घोले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आदित्य ठाकरे यांना पाठवलेलं पत्र शेअर केलं आहे. आपण जड अंत:करणाने हा निर्णय घेत असल्याचं अमेय म्हणाले आहेत. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून आपण तसा निर्णय घेतल्याची तक्रार त्यांनी पत्रात केली आहे.

“मी राजकारणात तुमच्यामुळे आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेली 13 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. पण वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला काम करताना खूप त्रास आणि मनस्ताप झाला”, असं अमेय घोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे आणि मला सुरळीतपणे माझे कार्य सुरु ठेवता यावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. पण काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंत:करणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. सांगण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या – कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे”, अशा शब्दांत अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र पाठवत राजीनामा दिलाय.

“आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरता नाही. तुमच्याबरोबर संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो”, अशी आशा त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली. अमेल घोले यांच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे त्यांची मनधरणी करतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच अमेय घोले यांच्या निर्णयावर आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमेय घोले यांचा शिवसेनेत प्रवेश

अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांना भावनिक पत्र पाठवत राजीनामा दिला असला तरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जातोय. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अमेय घोले यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडी कुठपर्यंत जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.