देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर युवासेनेची मोहिम, खुद्द वरुण सरदेसाई नागपुरात

“महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाछी ED, CBI हा विरोधकांचा शेवटचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार आणखी मजबूत होणार आणि हे सरकार पाच वर्षे चालेल” असा विश्वास युवा सेना नेते सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर युवासेनेची मोहिम, खुद्द वरुण सरदेसाई नागपुरात
देवेंद्र फडणवीस आणि वरुण सरदेसाई
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 1:54 PM

मुंबई : सरकार पाडण्याच्या विविध तारखा किंवा मुहुर्त विरोधी पक्षाचे नेते सांगत असतात. सरकारमध्ये असलेले नेते त्या-त्या वेळी संबंधित नेत्यांच्या आरोपांना उत्तर देखील देत असतात. आता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी विरोधी पक्षाला प्रत्युत्तर दिलंय. विरोधी पक्षाने कितीही खटाटोप केला तरी महाविका, आघाडीचं सरकार 5 वर्षे टिकणारच, असं सरदेसाई म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात युवा सेनेचा आजपासून संपर्क सुरु झालाय. नागपूरमध्ये जाऊन त्यांनी विरोधी पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला.

सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न करा, सरकार 5 वर्षे टिकणारच

“महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाछी ED, CBI हा विरोधकांचा शेवटचा प्रयत्न आहे. पण याचा काहीही उपयोग होणार नाही. महाविकास आघाडी सरकार आणखी मजबूत होणार आणि हे सरकार पाच वर्षे चालेल” असा विश्वास युवा सेना नेते सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

पक्षाचं संघटन मजबूत असणं आवश्यक, त्यासाठीच हा दौरा

आजपासून नागपुरातून युवासेनेचा पदाधिकारी संपर्क दौरा सुरु झालाय. यावेळी वरुन सरदेसाई माध्यमांशी बोलत होते. युवा सेनेचा हा संपर्क दौरा असून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक निवडणुकीला युवा सैनिक तयार असतो. पक्षाचं संघटन मजबूत असणं आवश्यक असतं. त्याचमुळे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठीच हा दौरा असल्याचं सरदेसाई म्हणाले.

नागपुरात सरदेसाईंचा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद

पूर्व नागपुरात वरुन सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, आ. दुष्यंत चतुर्वेदी आणि युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

(Yuva Sena Leader Varun Sardesai taunt BJP over Criticism Mahavikas Aaghadi Govt)

हे ही वाचा :

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, गोपीचंद पडळकरांची टीका

VIDEO: अशोक चव्हाण एकटेच दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.