झोटिंग समिती फास होता, खडसेंना केवळ त्रास होता, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते : नाना पटोले

एकनाथ खडसेंसारख्या (Eknath Khadse) माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती (Zoting committee) हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

झोटिंग समिती फास होता, खडसेंना केवळ त्रास होता, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 4:11 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या (Eknath Khadse) माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती (Zoting committee) हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग कमिटीचा अहवाल गायब आहे. त्यावरुन पटोलेंनी हल्लाबोल केला.  (Zoting committee was trap for)

इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे. भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल पटोलेंनी केला.

निवडणुकांची रणनीती आखली

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्याची रणनीती आखली. मराठा आणि OBC समाजाचे आरक्षण कसे देता येईल याची चर्चा झाली.

महाविकास आघाडीत एकमत

महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकणं माझं काम आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीदेखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं.

महागाई विरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीकोनातून बैठका सुरु आहेत. कोणीतरी मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरतात, केंद्र लस पुरवत नाही. चीन बॉर्डवर येऊन बसला आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या 

खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?; अहवाल मिळत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण

एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय: राज ठाकरे

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.