‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत झालेल्या पावसानंतर जागोजागी साठलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं करुन दाखवलं अशी उपरोधिक टीका केली आहे (Pravin Darekar on water logging in Mumbai).

'शिवसेनेनं करुन दाखवलं', 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 3:55 PM

पुणे : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पावसानंतर जागोजागी तुंबलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं करुन दाखवलं अशी उपरोधिक टीका केली आहे (Pravin Darekar on water logging in Mumbai). प्रवीण दरेकर म्हणाले, “शिवसेनेने मुंबईची तुंबई केली आहे. मुंबईत वरवर कामं केली जात आहेत. ते मूळ मुद्द्याकडे लक्षच देत नाहीत. पावसाळा गेल्यानंतर काम करण्यासाठी 7 ते 8 महिने राहतात, तरीदेखील काहीही कामं केली जात नाहीत. मागील 30 ते 40 वर्ष शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केलं?” ते पुण्यात बोलत होते.

प्रवीण दरेकर यांनी नाबार्डच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, “काल (22 सप्टेंबर) गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकास प्रकरणांना अर्थ पुरवठा करण्यासाठी नाबार्डने जे निर्बंध घातले आहेत ते बंधने उठवण्यासंदर्भात नाबार्डच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांच्याकडे पुनर्विकासाचे 1600 प्रस्ताव आले आहेत आणि नाबार्डने त्यावर बंधन घातली आहेत. यात कोणाचेही लागेबांधे नाहीत. या योजनेची अनेक ठिकाणी विचारणा झाली. आज नाबार्डला त्याविषयी माहिती दिली. भाजप शिवसेना सरकार काळात त्याला सरकारी योजनेचं स्वरुप मिळाला. नाबार्डसोबतची बैठक चांगली झाली. त्यामुळे मुंबईकरांचा चांगला विषय मार्गी लागेल.”

“मराठा समाजाचा उद्रेक थांबवण्यासाठी सरकारकडून EWS च्या सवलती”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “सरकारनं मराठ्यांना आता आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलती दिल्या आहेत. त्यावर मी समाधानी नाही. मराठा समाजाला चांगले पॅकेज द्यायला हवे होते. जो उद्रेक होतोय तो थांबवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. पण सरकारकडून मराठा समाजाला मलमपट्टी लावायचं काम केलं जातंय.”

“शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस जाणं ही एक रुटीन प्रक्रिया असावी. त्यात विरोधी पक्षाला उगीच त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजिबात हेतू नाही, असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. त्यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर भाष्य करताना सांगितलं, “सरकार कारखान्यांना, शेतकऱ्यांना मदत करते. त्याचप्रमाणे ऊसतोड कामगारांनाही मदत केली पाहिजे. सरकारने ऊसतोड कामगारांना मदत केली नाही, तर विरोधीपक्ष नेते म्हणून त्यावर जाब विचारु.”

प्रवीण दरेकर यांनी कंगनाच्या चौकशीच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं, “कंगना ड्रगिस्ट राहिली असेल तर तिची देखील चौकशी व्हावी. कंगनाच्या चौकशीला आमची काहीच हरकत नाही.”

संबंधित बातम्या :

Mumbai Rains LIVE : नायर रुग्णालयात पावसाचे पाणी, अत्यावश्यक सेवा वगळता कार्यालयांना सुट्टी

Mumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

Mumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली

संबंधित व्हिडीओ :

Pravin Darekar on water logging in Mumbai and Maratha Reservation

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.