स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करा, केंद्राकडे जादा रेल्वे गाड्यांची मागणी करा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला
सर्व स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
पुणे : सरकारने स्थलांतरित मजुरांना आपापल्या (Chandrakant Patil Advise Thackeray Govt) गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, शहरी भागातून आपल्या गावी बसेसने जाणाऱ्यांकडून दुप्पट भाडे आकारण्याचा शासन आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशीही मागणी त्यांनी (Chandrakant Patil Advise Thackeray Govt) केली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर रोजगारासाठी परराज्यातून येऊन महाराष्ट्राच्या विविध भागात वसलेले मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापैकी काहीजण जीवावर उदार होऊन पायी निघाले आहेत. औरंगाबादमध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेत पायी जाणाऱ्या मजुरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा सर्व स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
केंद्र सरकार सर्व प्रवाशांचा 85 टक्के खर्च उचलत आहे. केवळ 15 टक्के भार हा राज्य सरकारला करायचा आहे. महाराष्ट्रातील मजुरांचे स्थलांतराचे प्रमाण पाहता राज्य सरकारने हा भार उचलून केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी आणि या सर्व प्रवाशांचा आपापल्या गावी परतण्याचा मार्ग सुकर करावा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil Advise Thackeray Govt).
दरम्यान, पुण्यात अडकलेल्या 134 जणांसाठी चंद्रकांत पाटलांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विशेष बसची व्यवस्था करुन दिली होती. या बसेस मधून हे सर्वजण गुरुवारी रात्री तेलंगणातील आपल्या गावी रवाना झाले.
लालपरी सज्ज, अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार, ‘या’ अटींसह प्रवास शक्यhttps://t.co/N4pQ0ubS2a#Lockdown3 #MaharashtraGovt #CoronaInMaharashtra #STBus
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2020
अडकलेल्या नागरिकांसाठी मोफत एसटी सेवा, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून (Free ST Bus Service) करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी सर्व ठिकाणच्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे. यासाठी मोफत एसटी बस सेवा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Chandrakant Patil Advise Thackeray Govt
संबंधित बातम्या :
मुंबईने पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही, राजस्थानी संघटनेची भूमिका
परप्रांतियांचे परतण्यासाठी लोंढे, कसारा घाट हाऊसफुल्ल, वाहनांच्या लांबच लांब रांगा
सांगलीत परप्रांतियांचा हैदोस, सिगरेट न दिल्याने दुकानदाराची स्विफ्ट पेटवली, दुकानाची तोडफोड