AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona | पुण्यात एका रात्रीत तब्बल 53 रुग्ण वाढले, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

पुणे जिल्ह्यात काल मध्यरात्रीपर्यंत 32 रुग्ण तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत 21 कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले. (Corona Hot spot Pune Ward wise Patients)

Pune Corona | पुण्यात एका रात्रीत तब्बल 53 रुग्ण वाढले, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 10:24 AM

पुणे : पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 934 वर गेली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत एकूण 171 रुग्ण आढळले आहेत. (Corona Hot spot Pune Ward wise Patients)

पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत 32 रुग्ण तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत 21 रुग्ण वाढले. एकूण मृतांचा आकडा 59 वर गेला आहे.

पुणे शहरात 22 एप्रिलपर्यंत 783 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. यामध्ये पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 768 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

भवानी पेठेत सर्वाधिक म्हणजे 171 रुग्ण आहेत, तर कोथरुड बावधन परिसरात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण आहे. कसबा विश्रामबाग वाड्यापाठोपाठ ढोले पाटील रोड भागातील रुग्णसंख्याही शंभरीपार गेली आहे. येरवडा-धानोरी आणि शिवाजीनगर-घोले रोड भागात 75 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.

भवानी पेठेत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्ण वाढण्याचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. कालच्या दिवसात इथे तीन रुग्ण वाढल्याने थोडाफार दिलासा मिळू शकतो. नजीकच्या दिवसात एकही नवा रुग्ण सापडू नये, अशी अशा व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट ठरल्याने महापालिकेकडून इथे विशेष खबरदारी घेतली जात होती. औंध-बाणेर आणि कोथरुड-बावधन भागात गेल्या अनेक दिवसात नवा रुग्ण न सापडल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.

दुसरीकडे, शिवाजीनगर-घोलेरोड (18 नवे रुग्ण), येरवडा-धानोरी (14), ढोले पाटील रोड (13), कसबा-विश्रामबाग वाडा (9) या भागात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 2 (0) कोथरुड – बावधन – 1 (0) वारजे – कर्वेनगर –9 (+1) सिंहगड रोड – 9 (+1) शिवाजीनगर – घोलेरोड – 77 (+18) कसबा – विश्रामबाग वाडा –111 (+9) धनकवडी – सहकारनगर – 43 (+5) (Corona Hot spot Pune Ward wise Patients) भवानी पेठ – 171 (+3) बिबवेवाडी – 24 (0) ढोले पाटील रोड – 110 (+13) कोंढवा – येवलेवाडी – 12 (+2) येरवडा – धानोरी – 82 (+14) नगर रोड – वडगाव शेरी – 18 (+2) वानवडी – रामटेकडी – 34 (+2) हडपसर – मुंढवा – 26 (0) पुण्याबाहेरील – 39 (+2)

(Corona Hot spot Pune Ward wise Patients)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....