Pune Collector | पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी राजेश देशमुख सुरुवातीपासूनच सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते.

Pune Collector | पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 3:27 PM

पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पेच अखेर सुटला आहे. आयएएस अधिकारी राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून राजेश देशमुख यांच्या नावाचा आग्रह धरला जात होता. (IAS Rajesh Deshmukh deputed as the new collector of Pune)

आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.

कोण आहेत राजेश देशमुख?

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी राजेश देशमुख सुरुवातीपासूनच सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. देशमुख हे मुंबईतील हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणूनही काम केलं आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारच पालकमंत्री असलेल्या या ‘कोरोनाग्रस्त’ जिल्ह्याचा कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने उपाययोजना करण्यासाठी मर्यादा येत होत्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्जीचा अधिकारी नियुक्त करण्यावर भर होता. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष सुरु होता. (IAS Rajesh Deshmukh deputed as the new collector of Pune)

शर्यतीत कोण होते?

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची नावेही चर्चेत होती. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचंही नाव मागं पडलं.

राजेश देशमुख यांच्या जागी कोण?

हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे. खेमनार यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदावरुन नुकतीच बदली झाली होती.

माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम PMO मध्ये

पुण्याचे मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमओमध्ये उपसचिवपदी नवल किशोर राम यांची वर्णी लागली आहे. चार वर्षांसाठी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत.

संबंधित बातम्या

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार फिल्डिंग, मंत्र्यांकडे लॉबिंग, चार नावं चर्चेत

(IAS Rajesh Deshmukh deputed as the new collector of Pune)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.