‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’; कोरोनाविरोधात अमोल कोल्हेंचा नेमका प्लॅन काय?

खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला 'को एक्झिस्टींग विथ कोरोना' असा प्लॅन तयार करण्याचा सल्ला दिला आहे ( Co-existing with corona Plan).

'को एक्झिस्टींग विथ कोरोना'; कोरोनाविरोधात अमोल कोल्हेंचा नेमका प्लॅन काय?
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 11:00 PM

पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे ( Co-existing with corona Plan). पुण्यातील कोरोनाबाधितांचा संख्या 900 पेक्षाही जास्त झाली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लॅन तयार करण्याचा सल्ला दिला आहे ( Co-existing with corona Plan).

कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं. या पथकाची आज (24 एप्रिल) विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील खासदार, आमदार आदींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत अमोल कोल्हे यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

“लॉकडाऊन दीर्घकाळ पर्यंत थांबवणं आपल्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य जनता यापैकी कुणालाच परवडणारं नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरिया, H 1 N 1 अशा आजारांसह दैनंदिन आयुष्य जगतोय त्याच धर्तीवर ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा”, असा सल्ला अमोल कोल्हे यांनी दिला.

लॉकडाऊन केला आहे. मात्र आपण मास टेस्टींग करत नाही, हे विसंगत आहे. तेव्हा मास टेस्टींग करावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. “‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ प्लान तयार करुन प्रथम ग्रीन झोन मध्ये त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरु करावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑरेंज आणि रेड झोनमध्ये हा प्लॅन राबवावा”, असे कोल्हे यांनी सांगितले.

राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका यासह विविध विभागांनी आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी बजावली असून त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग आटोक्यात आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“राज्य सरकार परराज्यातून आलेल्या कामगारांची चांगली काळजी घेत आहे. त्यांना आणि केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवीत आहे. परंतु परराज्यातून आलेल्या कामगारांना घराची ओढ लागली आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी विशेष ट्रेन्सचे नियोजन करण्याची उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांची मागणी मान्य करावी”, अशी सूचना कोल्हे यांनी केंद्रीय पथकाला केली.

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचार करणाऱ्या स्टाफची इंटरव्हलला नियमित तपासणी करण्यात यावी. उपचार करणारी रुग्णालये कोरोना संसर्गाची केंद्रीय बनणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना अतिशय अस्पष्ट (व्हेग) आहेत. त्यामुळे आयुर्वेद, युनानीसह सर्व शाखांचा ‘कंबाईन इंटिग्रेटेड मेडिकल अॅप्रोच’ केंद्र सरकारने तयार करावा, अशी मागणीअमोल कोल्हे यांनी केली.

संबंधित बातम्या :

Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.