AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसशी संबंधाच्या संशयातून दोघांना अटक, पुण्यात एनआयएची कारवाई

आयसीसशी संबंध असल्याच्या संशयातून पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली (NIA action on suspect link terrorist organization) आहे.

आयसीसशी संबंधाच्या संशयातून दोघांना अटक, पुण्यात एनआयएची कारवाई
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 8:30 AM

पुणे : आयसीसशी संबंध असल्याच्या संशयातून पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली (NIA action on suspect link terrorist organization) आहे. पुण्यात काल (12 जुलै) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. ही कारवाई इस्लामिक स्टेट्स (आयसीस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरुन झाली आहे, अशी शक्यता वर्तवली जात (NIA action on suspect link terrorist organization) आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने केलेल्या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे. बेकायदा हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (यूएपीए) कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा संबंध आहे. मिहेलेचे वय 21 आणि पुरुषाचे वय 27 आहे.

दिल्ली येथील “एनआयए”चे पथक काल पुण्यात आले होते. दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि विश्रांतवाडी पोलिसांच्या मदतीने “एनआयए”ने या दोन संशयितांना अटक केली.

महिलेला येरवडा येथून अटक केली आहे. तर कोंढवा येथून पुरुषाला अटक केली आहे. दोघाच्या फोन कॉलमध्ये काही संशयित फोन टॅप करण्यात आले असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा आयसीसशी संबंध असल्याचा संशय येत आहे.

याप्रकरणी स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. दोघांचीही तपास यंत्रणेकडून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

आजोबाच्या मृतदेहावर नातू, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य

PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा