पिंपरीतील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांची पुन्हा दगडफेक, कंटेन्मेंटचे सील तोडले

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आनंदनगर परिसरात (Pimpri Chinchwad Hotspot Anand Nagar) आज (8 जून) पुन्हा शेकडो नागरिकांनी दगडफेक आणि तोडफोड करत कंटेन्मेंटचे सील तोडले.

पिंपरीतील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांची पुन्हा दगडफेक, कंटेन्मेंटचे सील तोडले
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 5:18 PM

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आनंदनगर परिसरात (Pimpri Chinchwad Hotspot Anand Nagar) आज (8 जून) पुन्हा शेकडो नागरिकांनी दगडफेक आणि तोडफोड करत कंटेन्मेंटचे सील तोडले. “महापालिका प्रशासनाकडून आमच्या जेवणाची व्यवस्था होत नाही”, अशी तक्रार करत तेथील नागरिक रस्त्यावर उतरले (Pimpri Chinchwad Hotspot Anand Nagar). विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश होता.

आनंदनगर परिसर 13 मे पासून सील करण्यात आला आहे. मुंबईतील धारावी प्रमाणेच आनंदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आनंदनगरमध्ये गेल्या 25 दिवसांतच कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार गेला आहे. त्यामुळे या भागाला कंटेन्मेंट झोनच्या यादीतून अद्याप हटवण्यात आलेलं नाही.

आनंदनगर परिसर हा भाग कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या परिसरातून तब्बल 200 हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आनंदनगर परिसरात 2300 घरे असून यामधील नागरिकांची लोकसंख्याही दहा हजाराच्या वर आहे.

कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढू नये यासाठी हा परिसर महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लागणारी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली आहेत. याअगोदर 20 मे रोजी घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्याने परिसरातील लोक घराबाहेर पडली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

वातानुकूलित रुममध्ये बसून महापालिका प्रशासन अधिकारी हे परिसर सील करण्याचा निर्णय घेत असतात मात्र स्थानिक पातळीवर जाऊन या नागरिकांना कुठल्या प्रकारची मदत हवी आहे हे मात्र कुठलाही प्रशासन अधिकारी पहात नाही, असा आरोप करत जमावाने निषेध केला होता. काही काळाने हा वाद निवळला होता. मात्र, आज पुन्हा आनंदनगर परिसरातील नागरिक आक्रमक झाले.

महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा उद्रेक

आनंदनगर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांचे हातावरती पोट आहे. जवळपास महिन्याभरापासून कामधंदा बंद आहे. याशिवाय प्रशासनाकडून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला.

संबंधित बातमी :

चिंचवडमधील हॉटस्पॉट आनंदनगरात शेकडो नागरिक रस्त्यावर, जीवनावश्यक वस्तू संपल्याचा संताप

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.