पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकाने बंदच राहणार
पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यासंदर्भात आतापर्यंत प्रशासनाचा (Pune Liquor shops Closed) कोणताच निर्णय झालेला नाही.
पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात (Pune Liquor shops Closed) आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितले. मात्र पुणे जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकान बंदच ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यासंदर्भात आतापर्यंत प्रशासनाचा (Pune Liquor shops Closed) कोणताच निर्णय झालेला नाही. मद्य विक्री दुकानासंदर्भात नव्याने कोणताही आदेश काढलेला नाही, दुकाने बंदच राहतील. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटलं आहे.
यापूर्वी लॉकडाऊनदरम्यान घेतलेला मद्य विक्री संदर्भातील निर्णय पुढील आदेशापर्यंत कायम राहिल. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील मद्य विक्री पुढील आदेशापर्यंत बंद ठेवली जाईल. यासंदर्भात नवीन निर्देश आल्यानंतर दुकाने सुरु करायची की बंद ठेवायची याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत कोणतेच निर्देश मिळाले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दारु विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान ‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 14 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता तिन्ही झोनमध्ये नियम पाळून मद्यविक्रीला मुभा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) राहणाऱ्या मद्यप्रेमींना मात्र तूर्तास आणखी काही काळ वाट पहावी लागेल.
संबंधित बातम्या :
मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात ‘रेड झोन’मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी