Pune Corona : पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर
पुण्यात एका 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत रुग्ण हा बारामतीतील रहिवासी असून त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती.
पुणे : पुण्यात कोरोनाचा विखळा (Pune Corona Death Update) दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. पुण्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही वाढतो आहे. कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे काल रात्रीपासून ते आतापर्यंत दोन पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बळींची संख्या आता 66 वर (Pune Corona Death Update) येऊन पोहोचली आहे.
पुण्यात एका 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत रुग्ण हा बारामतीतील रहिवासी असून त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना 20 तारखेला दाखल करण्यात आलं होतं. किडणीचा आजार असल्याने डायलिसिससाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला गेल्या 20 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अखेर आज त्यांचा मृत्यू झाला.
पुणे – पुण्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू, मृत रुग्ण हा बारामतीचा रहिवासी, पुण्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास, कोरनासह इतरही व्याधी असल्याचं निष्पन्न, 20 तारखेला अॅडमिट केलेल्या रुग्णाचा 25 एप्रिलला मृत्यू pic.twitter.com/n2NdQQY9WX
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 25, 2020
पुण्यात गेल्या 24 तासात दुसरा कोरोना मृत्यू हा पर्वती परिसरात झाला. येथे एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या वृद्धाचा काल (24 एप्रिल) रात्री उपचारादरम्यान झाला मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह (Pune Corona Death Update) आला.
पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक
पुण्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात तब्बल दीड महिन्यानंतर ही सर्वाधिक आहे. 24 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. पुण्याचा कोरोना मृत्यूदर 6.5 टक्के इतका आहे. तर, देशाचा कोरोना मृत्यूदर 3.2 टक्के आणि महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर 4.8 टक्के इतका आहे. म्हणजेच देशाच्या मृत्यूदरापेक्षा दुप्पट मृत्यूदर पुण्याचा आहे.
भारतात सध्या कोरोनाचे 20,080 रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक 6,817 कोरोना रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर, पुण्यात कोरोनाचे 980 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाहिला तर देशात आतापर्यंत 645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, महाराष्ट्रात कोरोनामुळे 301 आणि पुण्यात 64 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, अतिरिक्त निर्बंध, डोअर टू डोअर स्क्रिनिंग, पोलीस कारवाया, केंद्रीय पथकाची पाहणी आणि त्यानंतर वेगवेगळे उपायोजना राबवल्या जात आहेत. मात्र, तरीही पुण्याचा कोरोना मृत्यूदर कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता (Pune Corona Death Update) वाढली आहे.
राज्यातील कोरोना रुग्ण आणि कोरोना बळींची अद्ययावत माहिती :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
Pune Corona Update | पुण्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत 195 कोरोना रुग्ण, कोणत्या वॉर्डात किती?
पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू
‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’; कोरोनाविरोधात अमोल कोल्हेंचा नेमका प्लॅन काय?
‘पुण्यात कुणीही उपाशी झोपणार नाही’, कागदपत्रं नसणाऱ्यांसाठी शरद भोजन योजना