Pune Corona | पुण्यात सात रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीला कोरोनाचा विळखा

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 107 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Pune Corona | पुण्यात सात रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीला कोरोनाचा विळखा
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 8:17 PM

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला (Pune Corona Latest Update) आहे. आज पुण्यात 208 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 107 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 227 कोरोनाबळी ठरले (Pune Corona Latest Update) आहेत.

पुण्यात आज दिवसभरात 159 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2,182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुण्यात 1,698 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 169 रुग्ण क्रिटिकल असून 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जनता वसाहतीत आज 11 रुग्णांची भर, आकडा 40 वर

पुण्यातील जनता वसाहतमध्ये कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. आज जनता वसाहतीत तब्बल 11 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या ही 40 वर पोहोचली आहे. त्यामुळे सिंहगड परिसरातील रुग्णांची संख्या 42 झाली आहे.

गेल्या दोन दिवसात जनता वसाहतीत तब्बल 22 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 40 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, त्यांचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जनता वसाहतीत मंगळवारी (19 मे) दुपारपर्यंत 18 कोरोनाबाधित रुग्ण होते. मात्र, रात्रीपर्यंत 11 आणि बुधवारी नवीन 11 रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर आज पुन्हा 11 कोरोनाबाधित आढळून आले आहेत (Pune Corona Latest Update). दोन दिवसात तब्बल 22 बाधित रुग्णांची वाढ झाली. जनता वसाहतीत 40 जण क्वारंटाईन असून काहींचा स्वॅब अहवाल प्रलंबित आहे. तर सिंहगड परिसरात 54 जण क्वारंटाईन आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वसाहतीतील दहा गल्ल्या सील केल्या आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध घालण्यात आलेत. त्याचबरोबर रहिवाशांचं आरोग्य तपासणी केली जात आहे. परिसर निर्जंतुक केला जातो.

जनता वसाहतीत एकूण 110 गल्ल्या असून सर्वत्र उपयोजना राबवल्या जात आहेत. पालिकेच्या नवीन नियमावलीनुसार जनता वसाहत प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली. सुरुवातीला या वसाहतीतील एक रुग्ण डायलिसिससाठी रुग्णालयात गेला होता आणि या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यातच मेडिकलमध्ये काम करणारे पाच जण बाधित आढळून (Pune Corona Latest Update) आले.

संबंधित बातम्या :

Solapur Corona | सोलापुरात मटण विक्रेत्याला कोरोना, 18 जण रुग्णालयात, 63 जण होम क्वारंटाईन

Navi Mumbai Corona | नवी मुंबईत ‘कोरोना’चं थैमान सुरुच, रुग्ण संख्या 1,364 वर

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय

निम्मे कामगार मूळगावी रवाना, पुणे मेट्रोचे काम लांबण्याची चिन्हं

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....