AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे जिल्ह्यात 139 नवीन कोरोनाबाधित, 24 तासात सात रुग्ण दगावले

(Pune Corona Patients Number in a glance)

पुणे जिल्ह्यात 139 नवीन कोरोनाबाधित, 24 तासात सात रुग्ण दगावले
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 8:04 AM

पुणे : पुणे जिल्ह्यापाठोपाठ पुणे शहरातही ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने शतक ओलांडलं. तर पुणे जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात कालच्या दिवसात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने संख्या 2051 वर पोहोचली आहे. (Pune Corona Patients Number in a glance)

पुणे जिल्ह्यात कालच्या दिवसात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 111 कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. तर पुणे महापालिका हद्दीत गेल्या 24 तासात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील बळींचा आकडा 101 वर गेला आहे. दिवसभरात 55 रुग्णांना डिस्चार्जही मिळाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्या

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण- 2051

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्ण- 1813

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्ण- 122

पुणे ग्रामीण कोरोनाबाधित रुग्ण- 43 (हवेली- 25, जुन्नर- 1, शिरुर- 2, मुळशी- 1, भोर- 3, वेल्हा- 8, बारामती- 1, इंदापूर- 1, दौंड- 1)

कँटॉनमेंट आणि नगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण- 73 (बारामती नगरपालिका- 7, पुणे कँटॉनमेंट- 43, खडकी कँटॉनमेंट- 21, देहूरोड कँटॉनमेंट- 2)

कोरोनाबळी

पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’बळी- 111

पुणे शहरातील ‘कोरोना’बळी- 101

पिंपरी चिंचवड शहरातील ‘कोरोना’बळी- 04

पुणे ग्रामीणमध्ये ‘कोरोना’बळी- 4 (शिरुर- 1, बारामती- 1, इंदापूर- 1, हवेली- 1)

कँटॉनमेंट आणि नगरपालिका हद्दीतील ‘कोरोना’बळी- 5 (खडकी कँटॉनमेंट- 2, पुणे कँटॉनमेंट- 2, बारामती नगरपालिका- 1 )

कोरोनामुक्त रुग्ण

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या- 499

पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या- 425

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या- 50

पुणे ग्रामीणमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-12 (हवेली- 7, शिरुर- 1, जुन्नर- 1, मुळशी- 1, वेल्हा- 2 )

(Pune Corona Patients Number in a glance)

कँटॉनमेंट आणि नगरपालिका हद्दीतील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या- 13 (बारामती नगरपालिका- 6, खडकी कँटॉनमेंट- 2, पुणे कँटॉनमेंट- 5)

पुणे जिल्ह्यातील सॅम्पल टेस्टिंग संख्या- 16 हजार 935

पुणे जिल्ह्यातील क्रिटिकल रुग्णांची संख्या- 83 (पुणे महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये 45, ससूनमध्ये 30 आणि जिल्हा रुग्णालयात 5, ग्रामीण (DHO ZP) रुग्णालय 2)

पुण्याचा मृत्यूदर

पुण्याचा मृत्यूदर देशात आणि राज्यात सर्वाधिक राहिला आहे, मात्र मृत्यूदरात पूर्वीच्या तुलनेत मोठी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना मृत्यूदरात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.

हेही वाचा : पुण्याची रुग्णसंख्या दोन हजारावर, भवानी पेठेत 27 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

काही दिवसांपूर्वी पुण्याचा मृत्यूदर 13 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत मृत्यूदरात घसरण होऊन तो साडेपाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दहा एप्रिलला पुण्याचा मृत्यूदर साडेबारा टक्क्यांवर पोहोचला होता, तर 15 एप्रिलला मृत्यूदर 11. 49 टक्के होता, मात्र दोन मेपर्यंत तो 5. 47 टक्क्यांवर स्थिरावला आहे. 2 मे रोजी रुग्णसंख्या 1718 आणि मृत्यूचा आकडा 94 होता.

ससून रुग्णालयाचा विचार केल्यास ससूनचा मृत्यूदर 26 टक्क्यांवर आहे. सुरुवातीच्या काळात हाच मृत्यूदर 41 टक्क्यांवर होता. ससूनच्या मृत्यूदरातही पूर्वीच्या तुलनेत घट झाली आहे.

(Pune Corona Patients Number in a glance)

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.