AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona Update : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर

पुणे विभागात सध्या कोरोनाचे 1 हजार 905 रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे

Pune Corona Update : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 7:44 PM

पुणे :  राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी (Pune Corona Patients Update) घट्ट होत चालला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे विभागात सध्या कोरोनाचे 1 हजार 905 रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे (Pune Corona Patients Update), अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhaisekar) यांनी दिली.

दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत पुणे विभागातील 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागातील 18 हजार 59 नमून्यांची तपासणीही पूर्ण झाली आहे. यापैकी 16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर 1 हजार 905 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे विभागात आतापर्यंत 99 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 77 रुग्ण गंभीर आहेत. इतर उर्वरीत रुग्ण निरीक्षणाखाली आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Pune Corona Patients Update).

पुणे विभागात 1 हजार 905 कोरोनाबाधित

? पुण्यात 1 हजार 738 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

? साताऱ्यात 43 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

? सोलापूर जिल्हयात 81 कोरोनाबाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला.

? सांगली जिल्हयात 30 कोरोनाबाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

? कोल्हापूर जिल्ह्यात 13 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार पोहोचला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुण्यासह, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा अक्षरशः हाहा:कार माजला आहे. आज दिवसभरात 126 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 043 इतका झाला आहे. ‬

Pune Corona Patients Update

संबंधित बातम्या :

सोलापुरात महिलेसह 2 चिमुकल्यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घरी रवानगी

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार, कुठे किती नवे रुग्ण?

नांदेडहून पंजाबला परतलेल्या आणखी 25 भाविकांना कोरोना, रुग्णसंख्या वाढण्याची भीती

पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.