AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2020 | दगडूशेठ गणपतीची 127 वर्षांची परंपरा खंडित, यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच

पुण्याच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठचा गणेशोत्सव यंदा मुख्य मंदिरातच होणार आहे.

Ganeshotsav 2020 | दगडूशेठ गणपतीची 127 वर्षांची परंपरा खंडित, यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 9:02 PM

पुणे : पुण्यात यंदा गणेशोत्सव मंडपात नव्हे, तर मंदिरात करावं (Pune Dagdusheth Halwai Ganpati Ganeshotsav), पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्याच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठचा गणेशोत्सव यंदा मुख्य मंदिरातच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 127 वर्षांची परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत मंदिरं बंद असल्याने मंदिरांमध्ये गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याबाबत मंडळांमध्ये संभ्रम आहे (Pune Dagdusheth Halwai Ganpati Ganeshotsav).

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख हेमंत रासने, महेश सूर्यवंशी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि महापौरांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गणेशोत्सव साजरा करणार आहोत. गर्दी नियंत्रित ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

“यंदा हा स्वल्पविराम असून पुढील योग्य परिस्थितीत साजरा करु. यंदा गणेशोत्सवाला मंदिराला प्राधान्य द्यावं. मंदिर नसेल तर छोट्या जागेत श्री प्रतिष्ठापना करावी”, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. मात्र, कोणतीही सजावट नको. प्रतिबंधित भागात रुग्णवाहिकेसाठी जागा ठेवण्याचं आवाहन महापौरांनी केलं. तर, दरवर्षी साधारण पाच लाख घरगुती गणपतींचं विसर्जन होतं. त्यामुळे यंदा घरगुती बाप्पांचं सुद्धा विसर्जन घरातच करावं. मंडळांच्या श्रींचे सुद्धा मंदिरात विसर्जन होईल. त्यामुळे यंदा विसर्जन कृतीम हौद, विसर्जन घाट निर्माण केले जाणार नसल्याचं महापौरांनी सांगितलं (Pune Dagdusheth Halwai Ganpati Ganeshotsav).

यंदा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती आणि आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. त्याचबरोबर उत्सवाचे मुख्य आकर्षक असलेले सामुहिक महिला अथर्वशिर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशिर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेत.

अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत. भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव आणि गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्यासाठी एलईडी स्क्रिनची सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली.

Pune Dagdusheth Halwai Ganpati Ganeshotsav

संबंधित बातम्या :

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई

अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.