पुण्यात घरपोच दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर
पुण्यात घरपोच दारु विक्रीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतंच नियमावली जाहीर (Pune Liquor Home Delivery Rules) केली.
पुणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई टोकन पद्धतीने दारु विक्रीला परवानगी (Pune Liquor Home Delivery Rules) दिली आहे. यानंतर राज्यात 15 मे पासून घरपोच दारु विक्री केली जाणार आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी काही अटी आणि शर्ती ठेवल्या असून त्यानुसारच मद्यविक्री होणार आहे. पुण्यात घरपोच दारु विक्रीत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी बंधनकारक असणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील ग्राहकांना दारु मिळल्यानंतरच त्याचे पैसे द्यायचे (Pune Liquor Home Delivery Rules) आहेत. घरपोच दारु विक्रीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतंच नियमावली जाहीर केली. तसेच जो या नियमावलीचे उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात घरपोच दारु विक्रीबाबत नियमावली
- दारुच्या डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी करावी. तपासणीचा प्रमाणपत्रसोबत बाळगावे. प्रमाणपत्र धारकाला ओळखपत्र द्यावं.
- मास्क, हेड कॅप, हॅन्ड ग्लोज बंधनकारक
- हॅन्ड सॅनिटायझर वेळोवेळी वापरावे
- दारु विक्रेत्यांनी डिलिव्हरी बॉईजचं थर्मल स्कॅनिंग वेळोवेळी करावं.
- तापमान जास्त आढळले तर ओळखपत्र त्वरित काढून घ्यावं. वैद्यकीय तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सुविधा द्यावी.
- सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार घरपोच मद्य वितरण करावं.
- एखाद्या डिलिव्हरी बॉईज काम सोडलं तर त्वरित ओळखपत्र घ्यावं
- घरपोच मद्यविक्रीच्या विशेष नोंदी कराव्यात. घरपोच मद्यविक्री केलेल्या एक अतिरिक्त स्वतंत्र नोंदवही ठेवावी.
- ग्राहकांना दुकानातून थेट मध्ये विक्री करण्यास कोणतीही बाधा येणार नाही.
- सोशल डिस्टन्स ठेवावेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा
दरम्यान, लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी मद्यप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑनलाईन पद्धत वापरुन दारुविक्री सुरु करण्याची निर्णय सरकारने घेतला (Pune Liquor Home Delivery Rules) आहे.
संबंधित बातम्या
दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनोखी उपाययोजना
Online Liquor | ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी, घरपोच दारु मिळणार, राज्य सरकारचा निर्णय