Pune Corona | पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री तीन दिवसांसाठी बंद

पुढील तीन दिवस पुरेल इतका औषधसाठा किरकोळ विक्रेत्यांनी दुकानात ठेवावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केमिस्ट असोसिएशनने केले आहे (Pune Medicines Wholesale purchase selling close for three days)

Pune Corona | पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री तीन दिवसांसाठी बंद
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 8:02 AM

पुणे : पुण्यात औषधांची घाऊक खरेदी-विक्री येत्या शुक्रवारपासून तीन दिवस बंद रहाणार आहे. ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट’ने यासंबंधी निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मेडिकल स्टोअरमध्ये मात्र औषधं उपलब्ध होणार आहेत. (Pune Medicines Wholesale purchase selling close for three days)

‘कोरोना’च्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या म,मोहिमेचा भाग म्हणून औषधांची घाऊक खरेदी-विक्री बंद ठेवली जाणार आहे. उद्या (शुक्रवार 15 मे) ते रविवार 17 मेपर्यंत पुण्यात औषधांची बाजारपेठ बंद राहील. ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट’चे सचिव अनिल बेलकर यांनी ही माहिती दिली.

पुढील तीन दिवस पुरेल इतका औषधसाठा किरकोळ विक्रेत्यांनी दुकानात ठेवावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन बेलकर यांनी केले आहे

औषधाची घाऊक बाजारपेठ सदाशिव पेठेसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात आहेत. पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातील किरकोळ औषध विक्रेत्यांना गेल्या तीस वर्षांपासून या भागातून औषध पुरवठा केला जातो.

हेही वाचा : पुण्यात घरपोच दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

औषधांची खरेदी-विक्री करताना घाऊक बाजारपेठेतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे संसर्ग वाढू नये आणि औषधांच्या घाऊक विक्रीच्या दुकानांचे निर्जंतुकीकरण करता यावे, यासाठी ही बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.

तीन दिवसांच्या कालावधीत घाऊक दुकानांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत येत्या सोमवारपासून म्हणजेच 18 मेपासून औषधांची घाऊक बाजारपेठ नियमित पूर्ववत होईल, अशी माहिती सचिन बेलकर यांनी दिली. (Pune Medicines Wholesale purchase selling close for three days)

पुण्यात महापालिका कर्मचाऱ्यांनाही ‘कोरोना’ने ग्रासले आहे. आतापर्यंत 22 कर्मचाऱ्यांना लागण झाल्याची माहिती आहे. 22 पैकी चौघांना प्राण गमवावे लागले, तर 8 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित 10 रुग्ण उपचाराधीन आहेत.

पुण्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती, ही समाधानाची बाब आहे. पुणे शहरात काल कोरोनाचे 87 नवे रुग्ण आढळले, तर 168 रुग्ण बरे झाले. पुणे शहरात आतापर्यंत 1377 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यात 115 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी 32 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

(Pune Medicines Wholesale purchase selling close for three days)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.