Pune Lockdown | लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई
पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या तब्बल 6 हजार 799 बेफिकीर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 हजारांपेक्षा जास्त आहे. तर दीड हजारापर्यंत मृत्यूचा आकडा पोहोचला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील काही नागरिक अजूनही बेफिकीर असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपायोजना केली. दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या काही कमी नाही (Pune Police Take Action On 6,799 Citizen Who Are Not Using Mask).
जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या तब्बल 6 हजार 799 बेफिकीर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 20 लाख 47 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यात जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली. त्याचबरोबर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणांऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
जिल्ह्यातील हवेली तालुक्यात सर्वाधिक 1,782 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. इंदापूर तालुक्यात 899 कारवाया केल्या. दौंड तालुक्यात 874 कारवाई, बारामती 573 कारवाया करण्यात आल्या. तर, जुन्नर 456 कारवाया, मुळशी 540 कारवाया, शिरुर 435 कारवाया झाल्या. त्याचबरोबर वेल्हे 132 कारवाया, भोर 102 आणि आंबेगाव तालुक्यात 392 कारवाया करण्यात आल्या (Pune Police Take Action On 6,799 Citizen Who Are Not Using Mask).
पुण्यात लॉकडाऊनमध्ये 14 हजार 109 नव्या रुग्णांची भर
पुण्यात 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसात पुण्यात तब्बल 14 हजार 109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, यादरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात कोरोनाचे 63,351 रुग्ण
पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63 हजार 351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 हजार 484 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 1 हजार 514 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
पुण्यात लॉकडाऊनच्या काळात किती रुग्ण वाढले?
दिनांक | नवे रुग्ण | मृत्यू |
---|---|---|
14 जुलै | 750 | 25 |
15 जुलै | 1416 | 15 |
16 जुलै | 1812 | 17 |
17 जुलै | 1705 | 11 |
18 जुलै | 1838 | 18 |
19 जुलै | 1508 | 44 |
20 जुलै | 1817 | 31 |
21 जुलै | 1512 | 30 |
22 जुलै | 1751 | 39 |
एकूण | 14109 | 230 |
Pune Lockdown | पुण्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, तरीही 14 हजार 109 नव्या रुग्णांची भरhttps://t.co/7kHQjXOK6r@mohol_murlidhar @PMCPune #Punelockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2020
Pune Police Take Action On 6,799 Citizen Who Are Not Using Mask
संबंधित बातम्या :
Pune | बेड न मिळाल्याने ठिय्या देणाऱ्या पुण्यातील रुग्णाचा मृत्यू, महापौरांचा कारवाईचा इशारा
PMC Corona | पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांना कोरोना, 12 कर्मचारीही पॉझिटिव्ह
Pune Corona | पुण्याची कोरोना आकडेवारी चुकीची, यंत्रणांच्या समन्वयाअभावी आकड्यात घोळ