पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट

बुधवार पेठ ही पुण्यातली सर्वात मोठी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची वसाहत म्हणून ओळखली जाते (Pune Red Light Area struggling due to Covid Pandemic)

पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:41 AM

पुणे : कोरोना संकटात आणि लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसलेला घटक म्हणजे रेडलाईट एरियातील देहविक्री करणाऱ्या महिला….गेल्या सहा महिन्यापासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या या महिलांना आता देहविक्रीचा व्यवसाय सोडून भूक भागवण्यासाठी पर्यायी काम हवं आहे. (Pune Red Light Area struggling due to Covid Pandemic)

बुधवार पेठ ही पुण्यातली सर्वात मोठी तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची वसाहत म्हणून पाहिलं जातं आहे. या भागात सुमारे सातशे कुंटणखाने आणि जवळपास 3 हजार देहविक्रेत्या स्त्रिया असल्याचे सांगितले जाते. यातील 300 स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला.

त्यातील 87 टक्के महिलांनी सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वीही त्यांना देहविक्रीतून कुटुंबाचे पालनपोषण करण्याएवढं उत्पन्न मिळत होतं. मात्र आता त्यांना तेही मिळत नाही. मात्र शिक्षणाचा अभाव, रोजगाराच्या कौशल्यांची उणीव आणि परतीचे मार्ग खुंटल्यामुळे त्यांना या नरकात खितपत पडावे लागले आहे.

कोरोनाच्या साथीनंतर मूळच्याच तुटपुंज्या उत्पन्नातही मोठी घट झाली. त्यामुळे आता अवस्था बिकट झाली आहे. त्यातूनच कर्जाचे ओझे वाढले आहे. परिणामी बहुतेक सर्वच स्त्रियांना पर्यायी काम-व्यवसायाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आहे. या महिलांपैकी 82 टक्के महिला 25 ते 45 या वयोगटातील आहेत. तर 84 टक्के महिला अशिक्षित आहेत. त्यातील 16 टक्के मुली शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच ते सोडून या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे 84 टक्के महिलांना या परिस्थितीत देहविक्री करण्याची भीती वाटते.

संस्थेच्या म्हणण्यानुसार, देहविक्री करण्याऱ्या महिलांना आधीपासून अनेक यातनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी पुनर्वसनाची संधी दिली पाहिजे. यात सामाजिक संस्था आणि सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे हे मात्र जळजळीत सत्य आहे. (Pune Red Light Area struggling due to Covid Pandemic)

संबंधित बातम्या : 

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु

पुण्यातील कोव्हिड परिस्थिती विदारक, कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी बेडच नाहीत

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.