‘पुण्यात कुणीही उपाशी झोपणार नाही’, कागदपत्रं नसणाऱ्यांसाठी शरद भोजन योजना

पुण्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे नसतानाही गरजूंना अन्नधान्य दिलं जात आहे (Sharad Bhojan yojana).

'पुण्यात कुणीही उपाशी झोपणार नाही',  कागदपत्रं नसणाऱ्यांसाठी शरद भोजन योजना
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 11:24 PM

पुणे : लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिक हे पुणे शहरात (Sharad Bhojan yojana) अडकून पडले आहेत. काही नागरिकांची सोय झाली आहे तर काहींचे हाल होत आहेत. पुण्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे नसतानाही गरजूंना अन्नधान्य दिलं जात आहे (Sharad Bhojan yojana).

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने लॉकडाऊनदरम्यान कुणीही उपाशी राहू नये म्हणून शरद भोजन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून आता दारिद्र्यरेषेखालील आणि इतर व्यक्तींना रेशन पुरवण्याचं काम होणार आहे. पुणे जिल्ह्यात कोणीही उपाशी राहाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शरद भोजन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाच रुपयात गरजूंना जेवण उपलब्ध करुन देण्यात आलं. तर दुसऱ्या टप्प्यात दिव्यांग नागरिकांना अन्नधान्य देण्यात आलं आहे.

आता शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. यामध्ये एलजीबीटी समूह, धनगर, आदिवासी, पारधी, परराज्यातील अडकलेले मजूर यांच्यापर्यंत हे अन्नधान्य पोहोचविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीबरोबरच नगरपालिकेच्या हद्दीतही जिल्हा परिषद ही योजना राबवत आहे.

शरद भोजन योजनेअंतर्गत कोणीही उपाशी पोटी झोपणार याची काळजी घेण्यात येत आहे. तिसऱ्या टप्यात पन्नास हजार लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालाल आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर पोहोचला आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6,817 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे आज 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून यात पुण्याचे 5 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आज राज्यातील 114 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. पुण्यात लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. नियामांचे उल्लंघन करुन गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याशिवाय लॉकडाऊनदरम्यान जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सर्व सुविधा दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

दहिसर येथे माहेरी 1 महिना मुक्काम, भिवंडीत परतलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग

Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.