नवा जॉब कसा सर्च करायचा? प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना?, विद्यार्थ्यांसाठी खास वेबिनार
आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना? नवीन जॉब कसा सर्च करायचा? यासारखे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना सतावत आहेत. (Webinar on Freshers Placement)
पुणे : कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. आपल्या प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना? नवीन जॉब कसा सर्च करायचा? यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत. (Webinar on Freshers Placement) विद्यार्थ्यांना याविषयी योग्य असे मार्गदर्शन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स विभागा’तर्फे वेबिनार सीरिजचे आयोजन करण्यात आले आहे. (Webinar on Freshers Placement)
येत्या गुरुवारी 21 मे 2020 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी या वेबिनारमधील पहिले सत्र होणार आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, पुणे (MCCIA) चे अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव हे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे उद्घाटन कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. ही वेबिनार सीरिज विद्यार्थ्यांना प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स विभागाच्या फेसबुक पेजवर पाहता येईल.
वेबिनारसाठी फेसबुक पेजची लिंक : https://www.facebook.com/SPPUPCRC/
ही वेबिनार सिरीज विद्यार्थ्यांसाठी मोफत असून विद्यार्थी पुढील लिंकवर त्यांची नोंदणी करु शकतात.
नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/6oNPFguw9mRkz5wx6
“या वेबिनार सीरिजमध्ये विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट विषयी मार्गदर्शन करणार आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांच्यामध्ये एक वास्तववादी दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल.” असं कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, यांनी सांगितलं.
(Webinar on Freshers Placement)