मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेवर खुद्द शरद पवार यांची भूमिका काय आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे (Sharad Pawar on Gopichand Padalkar). शरद पवार याबाबत पुण्यात भाष्य करतात का, याकडे माध्यमांचं लक्ष होतं.

मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 4:43 PM

पुणे :  भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं म्हटलं होतं (Sharad Pawar on Gopichand Padalkar). त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केलं. या सर्व प्रकरणात खुद्द शरद पवार यांची भूमिका काय आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे. शरद पवार याबाबत पुण्यात भाष्य करतात का, याकडे माध्यमांचं लक्ष होतं. मात्र, शरद पवारांनी “मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन”, असं म्हटलं आहे (Sharad Pawar on Gopichand Padalkar).

पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला (Sharad Pawar on Pune Corona Situation).

या बैठकीनंतर शरद पवार यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी सेंटरमधील कोविड सेंटरला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी डॅशबोर्ड प्रणालीचीदेखील माहिती घेतली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ हेदेखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, “मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

हेही वाचा : शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना रामदास आठवलेंचा सल्ला

पुण्यात 9 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 18 हजारांच्या पार गेला. पुण्यात आतापर्यंत 655 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला जरी असला तरी मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. याशिवाय गेल्या आठ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. शरद पवार यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पुण्याचे जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. पुण्यात काही दुकानं सुरु झाली आहे. पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. पण अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे एकीकडे व्यवहार पूर्वपदावर आणायचे आहेत, तर दुसरीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवायचे आहेत. यासाठी काय उपाययोजना करायला हवेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर कुठे शिथिलता करायचे, कुठे नियम कडक करायचे याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाजप गप्प का? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रश्नावर दरेकर म्हणतात “मी फक्त कोरोनावर बोलणार”

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची ग्रँड एण्ट्री, 100 गाड्यांचा ताफा, प्रतिमेला दुग्धाभिषेक

सिंधुदुर्गातील वादळग्रस्तांना दमडीचीही मदत नाही, ठाकरे सरकारचा कोकणावर कुठला राग? : नितेश राणे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.