पुण्यात शिवसेनेचं अजब लॉजिक, युती झाली, मग आता सत्तेत वाटा द्या!
पुणे : स्वबळावर पुणे महापालिका लढणाऱ्या शिवसेनेने आता लोकसभेसाठी भाजपसोबत युती झाल्यानंतर अजब मागणी केली आहे. आता युती झाली, त्यामुळे पुणे महापालिकेतील सत्तेत सुद्धा वाटा द्या, अशी मागणी शिवसेनेने भाजपकडे केली आहे. आठवलेंच्या रिपाइं गटासोबत भाजप पुणे महापालिकेत एकहाती सत्तेत आहे. शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले यांनी याबाबत भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांना पत्र […]
पुणे : स्वबळावर पुणे महापालिका लढणाऱ्या शिवसेनेने आता लोकसभेसाठी भाजपसोबत युती झाल्यानंतर अजब मागणी केली आहे. आता युती झाली, त्यामुळे पुणे महापालिकेतील सत्तेत सुद्धा वाटा द्या, अशी मागणी शिवसेनेने भाजपकडे केली आहे. आठवलेंच्या रिपाइं गटासोबत भाजप पुणे महापालिकेत एकहाती सत्तेत आहे. शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले यांनी याबाबत भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले आहे.
162 जागांच्या पुणे महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढल्या. या निवडणुकीत भाजपला 98 जागा, तर शिवसेनेला केवळ 10 जिंकता आल्या. रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष भाजपसोबत होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुणे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली. पर्यायाने, शिवसेना विरोधात राहिली.
आता लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा केली. युती झाल्याने आता पुणे महापालिकेतल्या सत्तेतही वाटा पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
शिवसेनेच्या नेमक्या मागण्या काय?
- पुणे महापालिकेत पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद मिळावं,
- एक वर्षासाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावं.
- चार विषय समित्यांपैकी प्रत्येक वर्षी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळावं.
- एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळावं.
विशेष म्हणजे, शिवसेनेच्या या मागणीनंतर भाजपमध्येही सकारात्मक प्रतिक्रिया आहे. शिवसेनेच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार भाजपच्या गोटात आहे.