राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 12:59 PM

पुणे: राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. (shivsena leader sanjay raut reaction on raj thackeray-governor koshyari meet)

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना भाजपसह राज ठाकरे यांनाही फैलावर घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राज्यपालही पवारांना नेता मानतात याचा आनंद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरूनही राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात हयाचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. त्यामुळेा मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटून वाढीव वीज बिलाबाबत तक्रार केली होती. हे वीज बिल कमी करण्याचं आणि दूधाचे दर निश्चित करण्याबाबतचं निवेदन राज यांनी राज्यपालांना दिलं होतं. तेव्हा राज्यपालांनी राज यांना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपाल आणि राज यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा महाराष्ट्रात लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला. युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. (shivsena leader sanjay raut reaction on raj thackeray-governor koshyari meet)

संबंधित बातम्या:

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा

(shivsena leader sanjay raut reaction on raj thackeray-governor koshyari meet)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.