Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMPML बस सेवा सुरु करा, पुणे महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव

पुणे शहरात पीएमपीएमएल (PMPML) बससेवा सुरु करा, असा प्रस्ताव पीएमपीएमएलचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे दिला (PMPML Bus service Pune) आहे.

PMPML बस सेवा सुरु करा, पुणे महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 9:05 AM

पुणे : पुणे शहरात पीएमपीएमएल (PMPML) बससेवा सुरु करा, असा प्रस्ताव पीएमपीएमएलचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे दिला (PMPML Bus service Pune) आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान बससेवा सुरु करा, असं या प्रस्तावात म्हटलं आहे (PMPML Bus service Pune).

प्रतिबंधित क्षेत्र आणि शहराचा मध्य भाग सोडून उर्वरित शहरात सुमारे 20 मार्गांवर 95 बसच्या माध्यमातून बससेवा सुरू करता येईल, असंही प्रस्तावात म्हटले आहे.

शहरात 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आहे. दुकाने, उद्याने काही प्रमाणात सुरू झाली आहेत. विमान आणि रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत होत आहे.

रिक्षा आणि कॅबलाही काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सध्या खासगी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या नागरिकांकडे खासगी वाहने नाहीत, विशेषतः कष्टकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना कामावर जाण्यासही अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीएमएलची सेवा ठराविक वेळेत सुरू करावी, असा प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरे येथे पीएमपीएमएलची शटल सेवा सुरू करता येईल. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात येऊ शकते. बसमध्ये सध्या त्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे, असंही प्रस्तावात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown : 67 दिवस PMPML बस सेवा बंद असल्याने 100 कोटींचे नुकसान

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुन्हा PMPML बस धावणार, प्रवाशांसाठी नियम जाहीर

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.