भवानी पेठेत 266, ढोले पाटील रोडवरही दोनशेपार कोरोनाग्रस्त, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

शिवाजीनगर- घोलेरोड (15 नवे रुग्ण) आणि ढोले पाटील रोड (13 नवे रुग्ण) वगळता इतर प्रभागात कालच्या दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण आढळलेले नाहीत. (Ward wise Corona Patients in Pune)

भवानी पेठेत 266, ढोले पाटील रोडवरही दोनशेपार कोरोनाग्रस्त, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 5:32 PM

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच आहे. भवानी पेठ भागातील रुग्णसंख्या 266 वर पोहोचली आहे. ढोले पाटील रोड परिसरातील रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. तर शिवाजीनगर घोले रोड भागात कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर आहे. (Ward wise Corona Patients in Pune)

पुणे शहरात 29 एप्रिलपर्यंत 1444 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1335 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

पंधरा क्षेत्रिय कार्यालयांपैकी पाच ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आहेत. भवानी पेठेत तब्बल 266 रुग्ण आहेत. ढोले पाटील रोडला 203, तर शिवाजीनगर घोले रोडला एकूण 190 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी म्हणजे दोन रुग्ण कोथरुड बावधनला सापडले आहेत.

औंध – बाणेर, कोथरुड – बावधन, वारजे – कर्वेनगर आणि सिंहगड रोड परिसरात गेल्या काही दिवसात नवा रुग्ण न सापडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. शिवाजीनगर- घोलेरोड (15 नवे रुग्ण) आणि ढोले पाटील रोड (13 नवे रुग्ण) वगळता इतर प्रभागात कालच्या दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण आढळलेले नाहीत.

दोन वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत, तर तीन वॉर्डमध्ये रुग्णसंख्येने दीडशेचा टप्पा ओलांडला आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 4 (0) कोथरुड – बावधन –  2 (0) वारजे – कर्वेनगर – 9 (0) सिंहगड रोड –  11 (0) शिवाजीनगर – घोलेरोड – 190 (+15) कसबा – विश्रामबाग वाडा – 157 (+3) धनकवडी – सहकारनगर –  64 (+2) (Ward wise Corona Patients in Pune) भवानी पेठ – 266 (+3) बिबवेवाडी – 36 (0) ढोले पाटील रोड –  203 (+13) कोंढवा – येवलेवाडी – 19 (0) येरवडा – धानोरी – 167 (+9) नगर रोड – वडगाव शेरी – 35 (+4) वानवडी – रामटेकडी – 63 (+2) हडपसर – मुंढवा –  51 (+8) पुण्याबाहेरील – 55 (+2)

(Ward wise Corona Patients in Pune)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.