100 वर्षानंतर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी योगायोग, या राशींचं नशिब पालटणार
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.. या दिवसाचं महत्त्व हिंदू धर्मात सांगितलं गेलं आहे. पण यावेळी हा मुहूर्त दोन राजयोगामुळे खास असणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत

हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांचं विशेष महत्त्व आहे. यापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया.. वैशाख महिन्याच्या तृतीयेला हा मुहूर्त पडतो. यंदा अक्षय्य तृतीया हा सण 30 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. पण यावेळी अक्षय्य तृत्तीया हा सण खास असणार आहे. कारण 100 वर्षानंतर या मुहूर्तावर दोन योग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात मालव्य आणि गजकेसरी या योगांचं एक विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. हे दोन्ही योग व्यक्तीच्या कुंडलीत असतील तर भौतिक सुख आणि आर्थिक कोंडी सोडवणारी असते. अक्षय्य तृतीयेला चंद्र आणि गुरुची युती होत आहे. त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तर शुक्र उच्चर राशीत प्रवेश करणार असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. या दोन्ही योगामुळे काही राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत…
या तीन राशींना मिळणार लाभ
वृषभ : या राशीच्या लग्न स्थानात गजकेसरी योग, तर लाभ स्थानात मालव्य राजयोग तयार होत आहे. यामुळे या राशीची चांदी होणार आहे. या काळात आर्थिक गणित सुटेल. तसेच उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाची नवी माध्यमं निर्माण होतील. हाती घेतलेल्या कामातून चांगली कमाई होऊ शकते. आर्थिक योजना यशस्वी ठरतील आणि समाजात मानसन्मान वाढेल.
धनु: या राशीच्या चतुर्थ स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. तर त्यामुळे या राशीच्या जातकांना या कालावधीत चांगल्या स्थितीची अनुभूती घेता येईल. या काळात अकस्मित धनलाभ होऊ शकतो. ज्या व्यक्ती लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना चांगली स्थळं चालून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक वादही संपुष्टात येतील.
कुंभ : या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. असं असताना मालव्य आणि गजकेसरी योग जातकांना फलदायी ठरेल. मालव्य राजयोग धनस्थाना तयार होत आहे. त्यामुळे वाहन सुख आणि स्थावर मालमत्तेतून चांगला परतावा मिळेल. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक योजना यशस्वी होतील. तसेच अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)