200 वर्षानंतर गोचर कुंडलीत तयार होणार रुचकसह तीन राजयोग, या राशींना असा होणार फायदा

राशीचक्रात ग्रहांची स्थिती कधीच एकसारखी नसते. त्यामुळे कधी ग्रहांची थोडीफार तशीच स्थिती शेकडो वर्षांनी जुळून येते. असाच काहीसा प्रकार मार्च महिन्यात घडणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तीन राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.

200 वर्षानंतर गोचर कुंडलीत तयार होणार रुचकसह तीन राजयोग, या राशींना असा होणार फायदा
200 वर्षानंतर गोचर कुंडलीत मोठा उलटफेर, तीन राजयोगांमुळे या राशींचं होणार भलं
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 3:19 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी वेगळा आहे. त्यामुळे एका राशीत परतण्याचा अवधी हा वेगवेगळा असतो. तसेच ग्रहांच्या भेटीगाठी या एखाद्या राशीत शेकडो वर्षानंतर घडतात. त्यामुळे अशा स्थितीत काही दुर्मिळ योग घडून येतात. काही शुभ आणि अशुभ योग असतात. मार्च महिन्यातही अशीच काहीशी स्थिती असणार आहे. याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होणार आहे. मार्च महिन्यात शुभ असे तीन राजयोग जुळून येणार आहेत. शनिदेवाच्या कुंभ राशीतील गोचरामुळे शश महापुरुष राजयोग, मंगळ आपल्या उच्च अशा मकर राशीत प्रवेश करताच रूचक राजयोग, तर शुक्र आपल्या उच्च मीन राशीत प्रवेश करणार असून मालव्य राजयोग तयार होणार आहे. जवळपास 200 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…

या राशींना मिळणार लाभ

मकर : तीन राजयोगांचा लाभ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. मंगळ याच राशीत येणार असून उच्च रास आहे. त्यामुळे लग्न स्थानात फरक दिसून येईल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. तसेच आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल. एखादं अडकलेलं काम या कालावधीत झटपट पूर्ण कराल. उद्योगधंद्यासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तसेच काही ओळखी होतील. त्यातून कामाचा विस्तार करण्यास मदत होईल.

वृषभ : ग्रहांची या राशीच्या जातकांना अनुकूल ठरेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास येतील. समाजात मानसन्मान वाढेल. आर्थिक स्थिती खऱ्या अर्थाने रुळावर येण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर पडतील.

मिथुन : या राशीसाठी मार्च महिना एकदम मस्त जाईल. राजयोगामुळे काही अडचणी दूर होतील. न्यायलयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. उद्योगधंद्यात मोठी ऑर्डर हाती लागेल. त्यामुळे येत्या काही वर्षांचा प्रश्न सुटून जाईल. नोकरीतही बदल अपेक्षित आहे. मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.