Aries/Taurus Rashifal Today 4 November 2021 | राजकीय संबंधातून फायदा होईल, अडकलेले पैसे परत मिळतील

आज दिवाळी आहे. आजच्याच दिवशी भारतात लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. दिवाळीचा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. देवी लक्ष्मीची कुणावर कृपा असेल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल.

Aries/Taurus Rashifal Today 4 November 2021 | राजकीय संबंधातून फायदा होईल, अडकलेले पैसे परत मिळतील
Aries-Taurus
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 6:51 AM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : गुरुवार 4 नोव्हेंबर 2021 (Aries/Taurus Rashifal). आज दिवाळी आहे. आजच्याच दिवशी भारतात लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. दिवाळीचा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. देवी लक्ष्मीची कुणावर कृपा असेल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या गुरुवारचं संपूर्ण राशीभविष्य –

मेष राश‍ी (Aries)

आज तुमच्या प्रतिभा आणि क्षमतेच्या जोरावर तुम्ही असा निर्णय घ्याल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. यावेळी ग्रहस्थिती तुम्हाला काही यश संपादन करण्याची संधी देत आहेत. सणासुदीमुळे कौटुंबिक व्यस्तता राहील. तसेच, आज तुम्हाला कोणत्याही राजकीय संबंधातून काही फायदा होण्याची अपेक्षा आहे.

वैयक्तिक कामासोबतच कौटुंबिक कामातही मदत करणे आवश्यक आहे. स्वत:ची कोणतीही विशिष्ट माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करु शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. आळसाला तुमच्यावर अधिराज्य गाडवू देऊ नका.

कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. या काळात व्यावसायिक काम देखील मंद होतील. सरकारी नोकरांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जास्त काम करावे लागेल.

लव्ह फोकस – जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत तुम्हाला घर आणि व्यवसायात सुसंवाद राखावा लागेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

खबरदारी – आरोग्य चांगले राहील. अति कामामुळेच थकवा येईल.

लकी रंग – केशरी लकी अक्षर- क फ्रेंडली नंबर- 3

वृषभ राश‍ी (Taurus)

उधार किंवा अडकलेले पैसे परत मिळाल्याने शांतता राहील. घरात जवळच्या नातेवाईकांचे येणजाणे असेल. म्हणून प्रयत्न करत राहा. दिवसाच्या पूर्वार्धात तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या काळात ग्रहांची स्थिती चांगली राहील. जुन्या मित्राच्या भेटीमुळे मनाला शांती आणि आनंद मिळेल.

अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैसे अजिबात उधार घेऊ नका. दुपारनंतर कोणतीही अप्रिय बातमी किंवा माहिती मिळाल्याने घरात दुःखाचे वातावरण राहील. तुमची कामे काळजीपूर्वक पूर्ण करा, थोडासा निष्काळजीपणा हानिकारक ठरु शकतो.

व्यावसायिक कामे चांगली होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील. आज महिलांना त्यांच्या व्यवसायात विशेष यश मिळेल. नोकरी व्यावसायिकांना योग्य बोनस मिळण्याची शक्यता आहे.

लव्ह फोकस – पती-पत्नीचे नाते मधुर असेल. तुमच्या कामात जोडीदाराचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.

खबरदारी – आरोग्य चांगले राहील. पण, तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासत राहा.

लकी रंग – लाल लकी अक्षर – म फ्रेंडली नंबर – 7

Aries/Taurus Daily Horoscope Of 4 November 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | अत्यंत भावूक असतात या 4 राशीच्या व्यक्ती, कुणाच्याही वेदना हे पाहू शकत नाहीत

Zodiac Signs | अत्यंत गुणी असतात या 4 राशीच्या मुली, जिथे जातील तिथे कौतुक मिळवतात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.