Astro Tips : या दोन राशीच्या लोकांनी हातावर बांधू नये लाल धागा, काय आहे कारण?
कलव हा प्रामुख्याने तीन रंगांचा असतो. लाल, पिवळा आणि हिरवा. हे तीन रंग त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहेत. कलव हातात तीन वेळा गुंडाळला जातो. हिंदू धर्मात पूजेदरम्यान लाल आणि पिवळ्या रंगांना विशेष महत्त्व आहे.
मुंबई : हिंदू धर्मात पूजा, पठण, कथा, विधी आणि अभिषेक करताना हातावव लाल रंगाचा कलव (धागा) (Kalawa Benefits) बांधला जातो. ही एक प्रकारची परंपरा आहे. कलव अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. कलव हा प्रामुख्याने तीन रंगांचा असतो. लाल, पिवळा आणि हिरवा. हे तीन रंग त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहेत. कलव हातात तीन वेळा गुंडाळला जातो. हिंदू धर्मात पूजेदरम्यान लाल आणि पिवळ्या रंगांना विशेष महत्त्व आहे. बऱ्याचदा पूजेत सहभागी होणारे सर्व भाविक लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कलव बांधावा आणि कोणत्या राशीच्या लोकांनी लाल रंगाचा कलव बांधणे टाळावे.
असे आहे लाल धागा बांधण्याचे फायदे
हिंदू धर्मात लाल धाग्याला विशेष महत्त्व मानले गेले आहे. हे त्रिदेवाचे प्रतीक आहे. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहे. कलव बांधल्याने देव सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो. त्याला रक्षासूत्र असेही म्हणतात. हे रक्षासूत्र हातावर फक्त 3 वेळा गुंडाळावे. ज्योतिष शास्त्रानुसार पुरुष आणि अविवाहित मुलींनी कालव नेहमी उजव्या हातात बांधला पाहिजे. दुसरीकडे, विवाहित महिलांनी नेहमी डाव्या हातात कलव बांधावा.
कलवा बांधण्याचे फायदे
पौराणिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी आणि रामभक्त हनुमान कलव बांधल्याने प्रसन्न होतात. कुंडलीत सूर्य आणि मंगळाची स्थिती मजबूत असते. धनलाभ व लाभाचे योग जुळून येतात.
दोन राशीच्या लोकांनी कलव बांधू नये
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची रास मकर आणि कुंभ आहे त्यांनी लाल रंगाचा कलव बांधू नये. शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी असून शनिदेवाला लाल रंग आवडत नाही. असे केल्याने शनिदेव नाराज होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)