Astrology 2023 : शुक्राने तयार केला शक्तिशाली विपरीत राजयोग, तीन राशींना मिळणार जबरदस्त साथ
Astrology 2023 : शुक्र ग्रह सध्या कर्क राशीत वक्री स्थितीत आहे. त्यामुळे ग्रहमंडळात विपरीत राजयोग तयार झाला आहे. याचा तीन राशीच्या जातकांना फायदा होणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती वेगवेगळी फळं देत असते. कधी चांगली, तर कधी वाईट फळं भोगावी लागतात. एखादा ग्रह चांगल्या, तर दुसरा ग्रह वाईट स्थितीत असेल तर मात्र कर्माच्या सिद्धांतानुसार फळ पदरी पडतं, असं सांगितलं जातं. असं असताना ग्रहांच्या गोचरावरून ढोबळमानाने अंदाज बांधले जातात. तुमची वैयक्तिक कुंडलीही तितकीच प्रभावी असणं गरजेचं असतं. सध्या भौतिक सुखांचा कारक ग्रह कर्क राशीत अस्ताला जाऊन वक्री झाला आहे. यामुळे महाशक्तिशाली असा विपरीत राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा संपूर्ण राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत त्या..
तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
वृषभ : या राशीच्या जातकांना शुक्राची स्थिती लाभदायक ठरणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि सध्या तिसऱ्या स्थानात विराजमान आहे. शत्रूग्रहासोबत युती करून बसला आहे. त्यात वक्री आणि अस्तावस्थेत आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याचबरोबर प्रॉपर्टी आणि शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. मार्केटिंगची कामं करणाऱ्यांना चांगले क्लाइंट हाती लागू शकतात. पण असं असलं तरी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे.
सिंह : या राशीच्या जातकांनाही शक्तिशाली विपरीत योगाचा लाभ मिळणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी चालून येतील. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन आणि इंक्रिमेंट मिळू शकते. तसेच न्यायालयीन प्रकरणात मोठं यश मिळू शकते. व्यवसायिकांना धंद्यात प्रगती होताना दिसून येईल. तसेच हातात पैसा खेळता राहील. त्यामुळे इतर ठिकाणी गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल. काही कारणास्तव तब्येत ढासळू शकते. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
धनु : महाशक्तिशाली विपरीत राजयोग या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम देईल. शुक्र ग्रह या राशीच्या अष्टम भावात विराजमान आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसा परत मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होऊ शकते. रिसर्च क्षेत्राशी निगडीत लोकांना हा काळ अनुकूल असेल. पण या कालावधीत अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घ्या. लांबचा प्रवास करणं शक्यतो टाळा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)