Astrology 2023 : मंगळ ग्रहाचं कन्या राशीत गोचर, तीन राशीच्या जातकांना 77 दिवस मिळणार साथ

साहस, वीरता, शौर्य, जमिन आणि रागाचा कारक असलेला मंगळ ग्रह कन्या राशीत ठाण मांडणार आहे. या गोचरामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

Astrology 2023 : मंगळ ग्रहाचं कन्या राशीत गोचर, तीन राशीच्या जातकांना 77 दिवस मिळणार साथ
मंगळ ग्रह 77 दिवस कन्या राशीत मांडणार ठाण, तीन राशींना मिळणार असं पाठबळ
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 3:15 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. कारण ग्रह एका राशीत बसला की राशीचक्रात प्रत्येक राशीत त्याचं स्थान ठरतं. त्या त्या स्थानानुसार ग्रह फळं देतो. त्यामुळे ग्रहांचं गोचर ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्वाचं ठरतं. मंगळ ग्रह आता सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. कारण मंगळ या राशीत 77 दिवस ठाण मांडून बसणार आहे. 3 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करेल. या 77 दिवसात इतर ग्रहांची स्थिती वेगळी असली तरी मंगळाची तीन राशीच्या जातकांना साथ मिळेल. चला पाहूयात या तीन राशी कोणत्या आहेत त्या

या तीन राशींच्या जातकांना मिळणार लाभ

सिंह : मंगळ ग्रहाने कन्या राशीत ठाण मांडल्याने या राशीच्या धनस्थानात बळ मिळणार आहे. तसेच या राशीच्या पाचव्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात प्रगती दिसून येईल. काही चांगल्या गोष्टी अनपेक्षितपणे घडतील. या काळात धार्मिक कार्य आपल्या हातून घडतील. या काळात भावनिकपणे कोणाला शब्द देऊ नका. जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा.

धनु : मंगळ या ग्रह या राशीच्या कर्मभावात गोचर करत आहे. या राशीच्या बाराव्या आणि पंचम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसून येतील. चांगल्या पगाराची नोकरी या काळात मिळू शकते. तुम्ही एखाद्याला मदत केलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. वडिलोपार्जित जमिनीतून लाभ मिळेल. भावकीच्या वादात उगाच ठिणगी पडेल असं वागू नका. गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.

मकर : मंगळ या राशीच्या भाग्य स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे अकस्मितपणे लाभ मिळू शकतो. लॉटरी किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला उत्पन्न मिळू शकते. विदेशात शिक्षणाची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना लाब मिळेल. क्रीडा जगताशी निगडीत खेळाडूंना आणि मॅनेजमेंट स्टाफला चांले परिणाम दिसून येतील. मंगळाची साथ असली तरी तब्येतीची काळजी घेणंं गरजेचं आहे. एखादा आजार बळावू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.