Astrology : दहा दिवसात सूर्य सोडणार मकर राशीतील स्थान, या राशींच्या अडचणीत होणार वाढ

ग्रहमंडळात सूर्याला राजाचा दर्जा देण्यात आला आहे. सर्व ग्रह सूर्याच्या अवतीभोवती फिरतात. त्यामुळे सूर्याचं ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. सध्या सूर्यदेव मकर राशीत विराजमान असून दहा दिवसांनी गोचर करणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या जातकांची डोकेदुखी वाढणार आहे.

Astrology : दहा दिवसात सूर्य सोडणार मकर राशीतील स्थान, या राशींच्या अडचणीत होणार वाढ
Astrology : फक्त दहा दिवस आणि सूर्य मकर राशीतून करणार मार्गक्रमण, या राशींची डोकेदुखी वाढणार
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 12:13 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा निश्चित आहे. सूर्य हा महिनाभर एका राशीत ठाण मांडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. सूर्याच्या या मार्गक्रमणाला ज्योतिषशास्त्रात संक्रांची संबोधलं जातं.आता एका वर्षानंतर सूर्यदेव कुंभ राशीत येणार आहेत. १३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांनी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. ही रासही शनिची असून खुद्द शनिदेव या राशीत विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनिची युती होणार आहे. पित्रापूत्र असले तरी या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे महिनाभर काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही राशींनी महिनाभर तरी सांभाळून राहणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात सूर्य गोचरानंतर कोणत्या सर्वाधिक त्रास होईल ते..

या राशीच्या जातकांना होईल त्रास

कर्क : या राशीच्या जातकांना शनिची अडीचकी सुरु आहे. शनि सूर्याची अष्टम स्थानात युती होणार आहे. त्यामुळे एक महिन्याच्या कालावधीत मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना या कालावधीत अडचणींचा सामना करावा लागेल. सहकार्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही अडचणींचा डोंगर उभा राहील. जितके प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल तितके अधिक वाढतील.

सिंह : या राशीच्या सप्तम स्थानात सूर्य आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे पार्टनरशिपच्या व्यवसायात आणि पत्नीसोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते. तसेच विनाकारण काही गोष्टींवर पैसा खर्च करावा लागेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

वृश्चिक : या राशीला शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात शनि आणि सूर्याची युती होणार असल्याने डोकेदुखी वाढेल. नोकरी करणाऱ्या करणाऱ्या जातकांना महिनाभर तरी अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. दिलेलं टार्गेट पूर्ण करताना दमछाक होईल. आर्थिक स्थितीबाबत बोलायचं तर हाती पैसा टिकणार नाही. उत्पन्नापेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असेल. बेसिक गरजा पूर्ण करताना अडचण येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.