500 वर्षानंतर तीन राशींच्या गोचर कुंडलीत तयार होताहेत दोन शुभ योग, असा होईल पदोपदी फायदा
ग्रहांची प्रत्येक काही ना काही घडामोडी घडवत असते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य सारखं असं नाही. काही ना काही उलथापालथ होत असतात. त्यामुळे चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. नववर्ष सुरु झालं असून या वर्षात अशीच अनुभूती येणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..
मुंबई : ग्रहांची विशिष्ट स्थिती, एकमेकांसमोर उभं ठाकणं, तसेच आपल्या स्थानापासून इतर स्थानावर नजर टाकणं या सर्वांचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. राशीचक्रातील बारा राशींना याचे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. गोचर कुंडलीचा विचार करता मार्च महिन्यात ग्रहांची शुभ अशी स्थिती तयार होणार आहे. 500 वर्षानंतर एकत्र दोन शुभ योग तयार होणार आहेत. हा राजय शुक्र आणि शनिच्या प्रभावाने तयार होणार आहे. शनि आणि शुक्राचं तसं मित्रत्वाचं नातं आहे. त्यात शनिच्या प्रभावाने शश राजयोग आणि शुक्राच्या प्रभावाने मालव्य राजयोग तयार होत आहे. यामुळे काही राशींचं नशिब फळफळणार आहे. राशीचक्रातील तीन राशींना विशेष लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात तीन लकी राशींबाबत…
या तीन राशींना मिळणार लाभ
तूळ : या राशीच्या जातकांना मालव्य आणि शश राजयोगाचा लाभ मिळणार आहे. कारण शनि गोचर कुंडलीत पाचव्या स्थानी, तर शुक्र हा सहाव्या स्थानात आहे. त्यामुळे मुलांकडून शुभ समाचार मिळू शकतो. शुक्राची स्वामित्त्व असलेली ही रास असून या लोकांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. आपण बोलावं आणि तसंच व्हावं असा हा काळ असेल. प्रेमप्रकरणात अपेक्षित यश मिळेल.
कुंभ : या राशीत शनिदेव विराजमान असून ही शनिची रास आहे. त्यामुळे या राशीच्या लग्नस्थानात शश राजयोग तयार होत आहे. तर शुक्र धन स्थानात गोचर करत असल्याने आर्थिक स्थितीही सुधारेल. लग्नस्थान असल्याने आत्मविश्वास दुणावलेला राहील. करिअरमध्ये प्रगतीची नवी शिखरं गाठाल. तसेच शुक्राच्या मदतीने आकस्मात धनलाभ होऊ शकतो.
मिथुन : शनिदेव या राशीच्या नवव्या आणि शुक्र 12 व्या स्थानात असणार आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांची उत्तम साथ या कालावधीत मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीतून आत्मिक समाधान मिळेल. आपलं ध्येय गाठण्यासाठी सुरु असलेला आटापीटा पूर्णत्वास जाईल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक मेहनतीचं चीज होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)