ग्रहांचा राजा सूर्यदेवांचा चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश, तीन राशींवर पडेल मोठा प्रभाव
ज्योतिषशास्त्र इतकं व्यापक आहे की कोणत्या अंगाने विचार करून भाकीत करावं आणि कोणत्या नाही हे समजणं कठीण आहे. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीवरून त्याचे फलादेश सांगितले जातात. सध्या सूर्यदेव मकर राशीत आहेत. पण त्यांनी चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश केला आहे.
मुंबई : ग्रहांचं गोचर आणि त्यांची स्थिती यावरून ज्योतिष वर्तवलं जातं. प्रत्येक ग्रहांचा बारकाईने अभ्यास केला जातो. ग्रहांचा गोचर कालावधी वेगवेगळा आहे. सूर्यदेव सध्या मकर राशीत असून 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. ग्रह राशी परिवर्तनासोबत नक्षत्र बदलही करत असतात. त्यामुळे प्रत्येक टप्प्यात राशीचक्रावर परिणाम होत असतो. राशीबदल केलेल्यानंतर सूर्य कोणत्या चरणात विराजमान आहे हे देखील महत्त्वाचं ठरतं. 24 जानेवारीला मकर राशीतील सूर्याने चंद्राच्या श्रवण नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे सूर्य चंद्राच्या नक्षत्रातील प्रवेश खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुले राशीचक्रावर प्रभावी परिणाम होणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशी कोणत्या आहेत ते
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : मकर राशीतील या राशीत दशम स्थानात आहेत. त्यात नक्षत्र परिवर्तनामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती या काळात रुळावर येईल. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. प्रत्येक जण तुमच्या कामाचं कौतुक करेल. काही जण तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतील. पण वेळीच सावध राहा. वडिलोपार्जित जमिनीतून चांगली मिळकत मिळेल.
तूळ : सूर्यदेव या राशीच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत. त्यात नक्षत्र परिवर्तन केल्याने भौतिक सुखांची झटपट प्राप्ती होऊ शकते. वाहन किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अतृप्त इच्छा या कालावधीत पूर्ण होतील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
कन्या : सूर्यदेव या राशीच्या पंचम स्थानात विराजमान आहे. मनाचा कारक असलेल्या चंद्राच्या नक्षत्रात असल्याने शौर्यात वाढ होईल. मोठे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शिक्षण क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. धार्मिक यात्रेचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)