100 वर्षानंतर शनिमुळे तयार झाला पंचग्रही योग, या राशींचं होणार भलं; पण…
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळात ठरावीक कालावधी ग्रहांच्या गोचरानंतर योग तयार होतात. कधी त्याचे चांगले, तर कधी वाईट परिणाम भोगावे लागतात. नुकतंच शनि महाराजांनी कुंभ राशीत मीन राशीत प्रवेश केला आहे. यामुळे 100 वर्षानंतर पंचग्रही योग तयार झाला आहे. यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा ग्रह सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत जवळपास अडीच वर्षे ठाण मांडून बसतो. त्यामुळे शनिची स्थिती बदलली की ग्रहमंडळात उलथापालथ होणार हे निश्चित असतं. शनिदेव 30 वर्षानंतर मीन राशीत आले आहेत. पण या राशीत ग्रहांचा मेळा भरला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मीन राशीत शनि, सूर्य, बुध, शुक्र आणि राहु या ग्रहांची आघाडी झाली आहे. यात काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं. तर काही जणांचं अजिबात पटत नाही. या पाच ग्रहांच्या एकत्रित येण्याने पंचग्रही योग तयार झाला आहे. या योगाचा राशीचक्रावर प्रभाव पडणार हे निश्चित आहे. मात्र तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीत ग्रहांची स्थिती चांगली असेल तर या पंचग्रही योगाचा नक्कीच लाभ होईल, असं ज्योतिष सांगतात. पण काही राशींना जपून राहणं गरजेचं आहे. खासकरून मेष राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. अशा स्थितीत रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर मीन राशीच्या जातकांनी जीभेवर नियंत्रण ठेवावं. आपल्यामुळे कोण दुखवणार नाही याची काळजी घ्यावी.
या तीन राशींना मिळणार लाभ
मकर : या राशीच्या जातकांना पंचग्रही योगाचा लाभ मिळणार यात काही शंका नाही. कारण नुकताच साडेसाती कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या राशीच्या तिसऱ्या स्थानात हा योग तयार होत आहे. त्यामुळे यशाची नवी शिखरं गाठाल आणि गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. अडचणींवर एक एक मात कराल आणि यश संपादन कराल. जीवनात पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण तयार होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
मिथुन : या राशीच्या दशम स्थानात पंचग्रही योग तयार होत आहे. यामुळे या राशीच्या जातकांना करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. करिअरमध्ये नवी उंची गाठाल. तसेच जे काही हाती घ्याल ते चुटकीसरशी पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. त्याचा लाभ तुम्हाला प्रमोशनसाठी होईल. कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. व्यवसायातही झटपट वाढ होताना दिसेल. हा काळ विवाहासाठी अनुकूल आहे.
कन्या : या राशीच्या सातव्या स्थानात पंचग्रही योग तयार होत आहे. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. व्यवसाय करणाऱ्या जातकांना नव्या संधी चालून येतील. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. जीवनात मानसन्मान मिळेल. तसेच आत्मविश्वास दुणावल्याने कठीण कामंही सोपं कराल. संपत्तीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वाहन खरेदीचा योग आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)