Astrology: लग्न जुळण्यात येत असेल अडचणी तर जोतिष्यशास्त्रातले ‘हे’ उपाय नक्की करा
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी बऱ्याचदा अनेक स्थळं पहिल्या जातात. तर अनेकदा योग्य जोडीदार मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात अशा परिस्थितीत लग्न न होणे किंवा काही कारणाने उशिरा लग्न होणे हे पालकांसाठी सर्वात मोठे चिंतेचे कारण आहे (getting trouble to match marriage). या सगळ्याचे कारण कधी मांगलिक असते तर कधी […]
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी बऱ्याचदा अनेक स्थळं पहिल्या जातात. तर अनेकदा योग्य जोडीदार मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात अशा परिस्थितीत लग्न न होणे किंवा काही कारणाने उशिरा लग्न होणे हे पालकांसाठी सर्वात मोठे चिंतेचे कारण आहे (getting trouble to match marriage). या सगळ्याचे कारण कधी मांगलिक असते तर कधी चांगल्या मुलाचा किंवा मुलीचा शोध पूर्ण न होणे. जोतिष्यशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र हे ग्रह लग्नासाठी जबाबदार आहेत. जर हे दोन्ही ग्रह बलवान असतील तर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. याशिवाय शनि, मंगळ आणि सूर्य यांच्यामुळेही वैवाहिक जीवनात काही अडथळे येतात. अशा ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून वैवाहिक जीवनात येणारे अडथळे आणि समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला
याशिवाय मुलगा किंवा मुलीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी किमान 108 वेळा वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी. तसेच शक्य असल्यास, वडाच्या पिंपळ आणि केळीच्या झाडाला पाणी देऊन नित्यक्रम पूर्ण करा.
या दिशेला झोपा
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांचे विवाह योग तयार होत नाहीत, त्यांनी झोपण्याच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे. अशा स्थितीत मुलांनी दक्षिण आणि नैऋत्य दिशेला झोपू नये, तर मुलींनी उत्तर-पश्चिम दिशेला झोपावे. विवाह योगामध्ये झोपेची दिशा देखील महत्त्वाची भूमिका बजावते. यासोबतच झोपताना तुमचे पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिण दिशेला नसावेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासोबतच शक्य असल्यास गुलाबी चादर किंवा गुलाबी कपडे परिधान करून झोपावे.
अंघोळीच्या पाण्यात हळद टाका
याशिवाय विवाहाचा योग जुळण्यासाठी तरुण-तरुणींनी दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी. तसेच आंघोळीच्या पाण्यात गुलाबाची पाने टाकून अंघोळ करावी. असे केल्यास लवकरच विवाहाचे योग तयार होतील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)